Fact Check: आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे वृत्त जुने, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न-fact check old newspaper clipping of amar ujala reporting dalit atrocity and vandalism of the ambedkar statue shared as ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे वृत्त जुने, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न

Fact Check: आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे वृत्त जुने, सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न

Jun 20, 2024 12:11 AM IST

Ambedkar Statue Vandalism Fake News: आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे जुने वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.

आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे जुने वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.
आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे जुने वृत्त सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.

Vandalism of The Ambedkar Statue: सध्या सोशल मीडियावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याची बातमी वेगाने व्हायरल केली जात आहे. मुस्लिम समाजातील लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केली, असाही दावा केला जात आहे. यासंदर्भात एक्सवर व्हिडिओ क्लिप शेअर केली जात आहे. मात्र, या व्हायरल क्लिपमागील सत्य समोर आले असून ही बातमी जुनी आहे.

Fact Check
Fact Check

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जाणाऱ्या वर्तमानपत्राची क्लिपिंग समोर आली. या हिंदी भाषेतील वृत्तपत्र क्लिपिंगचे शीर्षक होते की, 'मुस्लिम जमावाकडून आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड, दलितांना मारहाण केली. फोटोत दिसणारी ही बातमी 'अमर उजाला ब्युरो'ने छापल्याचे दिसत आहे. यासंदर्भात आणखी तपासणी केली असता ही बातमी २०१९ मधील आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही बातमी पुन्हा सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.

या बातमीसंदर्भात अधिक पोस्ट पाहण्यासाठी येथे, येथे आणि येथे पाहा

न्यूजमीटरने तपासणी केली असता एप्रिल २०१९ मध्ये फेसबुक वापरकर्त्यांनी पोस्ट केलेली वृत्तपत्र क्लिपिंग आढळली. आम्ही एक कीवर्ड शोध घेतला आणि २१ एप्रिल २०१९ रोजी अमर उजाला द्वारे नोंदवलेली घटना आढळली. डिजिटल आवृत्तीचे शीर्षक थोडे वेगळे आहे.

व्हायरल बातमीनुसार, 'उत्तर प्रदेशातील देवरिया येथील गौरी बाजार येथील महुआवा गावात ही घटना घडली. दुसऱ्या समाजातील एका तरुणाने अनुसूचित जातीच्या वस्तीतील घरात घुसून एका किशोरवयीन मुलीची छेड काढली. मुलगी ओरडल्याने तिचे कुटुंब जागे झाले. या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत तो माणूस पळून गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो तरुण पुन्हा मुलीच्या घरात शिरला. कुटुंबीयांनी त्याचा पाठलाग केल्यावर तो सशस्त्र तरुणांच्या टोळक्यासह परतला आणि तिच्या कुटुंबावर हल्ला केला. यानंतर मदतीसाठी आलेल्या शेजाऱ्यांनाही त्यांनी मारहाण केली आणि बाहेर जाण्यापूर्वी आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड केली.'

निष्कर्ष- या घटनेची बातमी देणारी व्हायरल बातमी अमर उजालाने २०१९ मध्ये प्रकाशित केली होती. यामुळे नागरिकांना अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात News Meter ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.

Whats_app_banner
विभाग