Rahul Gandhi News: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजनेचा समावेश केला. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिला आणि विद्यार्थ्यांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाईल, असे अश्वासन देण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल गांधींनी दिलेल्या अश्वासनांसाठी माफी मागितली, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत अधिक तपासणी केली असता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती खोटी असल्याचे उघड झाले.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी सत्तेत आल्यानंतर महालक्ष्मी योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना प्रति महिना ८ हजार ५०० देण्याचे अश्वासन दिले. तसेच डिप्लोमा आणि पदवीधारकांना प्रशिक्षणार्थीसाठी वार्षिक १ लाख रुपये (प्रति महिना ८५००) स्टायपेंड मिळेल, असेही राहुल गांधी म्हणाले. मात्र, या अश्वासनांबाबत राहुल गांधींनी जनतेची माफी मागितली, अशी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल होत आहे.
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, "राहुल गांधींनी निवडणुकीपूर्वी गरीब कुटुंबातील महिला आणि विद्यार्थ्यांना प्रति महिना ८५०० रुपये देण्याच्या अश्वासनांसाठी माफी मागितली. राहुल गांधींनी खोटा प्रचार करून लोकसभा निवडणुकीत ९९ जागा मिळवल्या. यातून स्पष्ट होते की, राहुल गांधींनी मतदारांची फसवणूक आणि दिशाभूल केली आहे."
बहुतेक लोकांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. आणखी सोशल मीडिया पोस्ट पाहण्यासाठी येथे आणि येथे क्लिक करा. एक्सवरील तीन पोस्ट पाहण्यासाठी येथे, येथे आणि येथे क्लिक करा. याबाबत गूगलवर माहिती शोधण्यात आली. परंतु, व्हायरल दाव्याचे समर्थन करणारा असा कोणताही अहवाल सापडला नाही. त्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेसचे अधिकृत सोशल मीडिया हँडल (ट्विटर आणि फेसबूक) देखील तपासणी करण्यात आली. परंतु व्हायरल पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे अशी कोणतीही पोस्ट सापडली नाही.तसेच सोशल मीडिया विश्लेषण वेबसाईट सोशल ब्लेडद्वारा तपासणी केली असता राहुल गांधींच्या सोशल मीडिया खात्यावरील कोणतीही पोस्ट डिलीट झाली नाही.
काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात असे लिहिले आहे की, “काँग्रेस २५ वर्षांखालील प्रत्येक डिप्लोमाधारक किंवा महाविद्यालयीन पदवीधरांना खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी देण्यासाठी नवीन शिकाऊ अधिकार कायद्याची हमी देते. शिकाऊ उमेदवारांना वर्षाला एक लाख मिळतील. शिकाऊ उमेदवारी कौशल्ये प्रदान करेल, रोजगार क्षमता वाढवेल आणि लाखो तरुणांना पूर्णवेळ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल.”
निष्कर्ष- काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांसाठी माफी मागितली नाही. खोट्या दाव्यांसह एक बनावट पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात PTI News ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)
संबंधित बातम्या