Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या कानशिलात लगावलेली सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कुलविंदर कौर ही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या जवळच्या आहेत, असा दावा या फोटोतून केला जात आहे. एका फेसबुक वापरकर्त्याने कमेंट केली की, कुलविंदर कौरचे सत्य समोर आले आहे. कंगना राणौत बरोबर होती. या व्हायरल पोस्ट अधिक जाणून घेण्यासाठी येथे, येथे आणि येथे पाहू शकतो.
मात्र, हा दावा खोटा आहे. व्हायरल इमेजमधील महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबल कौर नसून, राजस्थानमधील विधानसभेच्या माजी काँग्रेस सदस्या (आमदार) आहेत.
या फोटोबाबत अधिक तपासणी केली असता राहुल गांधी यांच्यासोबत फोटोमध्ये दिसत असलेली महिला राजस्थानमधील माजी काँग्रेस आमदार दिव्या महिपाल मदेरणा आहे.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी मदेरणा यांनी स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिली होते की, "श्री. राहुल गांधी आणि श्रीमती प्रियांका गांधी यांचे स्वागत आहे." मदेरणा यांनी २०१८ च्या राजस्थान विधानसभा निवडणुकीनंतर आमदार म्हणून काम केले. परंतु, २०२३ मध्ये त्यांचा पराभव झाला.
द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, सोनिया गांधी यांनी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांच्यासोबत काँग्रेस नेते प्रियंका आणि राहुल यांच्यासह इतरही होते.
मदेरणा यांनी एक्सद्वारे स्पष्ट केले की व्हायरल फोटोमधील महिला कौर नाही तर ती स्वत:आहे. तसेच त्यांनी भाजपवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला. सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या दिवशी हा फोटो काढण्यात आल्याचे तिने स्पष्ट केले.
निष्कर्ष- राहुल गांधी यांच्यासोबत फोटोमध्ये दिसत असलेली महिला कौर नसून राजस्थान येथील आमदार आहेत.
डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Logically Facts ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.
संबंधित बातम्या