सोशल मीडियावर एक बातमी वणव्यासारखी पसरत आहे. पाकिस्तानातील एका मुलाने आपल्या आईशी लग्न केल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यांवर विश्वास ठेवून अनेक जण विविध कमेंट्स करत आहेत. मात्र, 'लाइव्ह हिंदुस्थान'ने याचा तपास केला असता सत्या काही वेगळेच समोर आले. अत्यंत भावनिक बातमी चुकीच्या पद्धतीने मांडली जात असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका युजरने लिहिले की, 'पाकिस्तानमधून धक्कादायक बातमी. १८ वर्षे पालन पोषण केल्यानंतर एका मुलाने आपल्या आईशीच लग्न केले. ही बातमी जगभर व्हायरल होत आहे. स्वत: अब्दुल अहद यांनी सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केली आहे. अब्दुलने स्वत: याचा खुलासा केला आहे. एक्स, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक युजर्सनी असाच दावा केला आहे. त्यावर अनेक जण कमेंट आणि शेअर करत आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हायरल फोटोंचा रिव्हर्स इमेज सर्च केला असता अब्दुल अहदच्या इन्स्टाग्राम प्रोफाइल समोर आली. आठवडाभरापूर्वी अहदने या फोटोंसह आपली संपूर्ण कहाणी शेअर केली आहे. याशिवाय आम्ही गुगलवर ‘Mother Son Marriage Pakistan’ हा शब्दही सर्च केला आणि आम्हाला टोलो (tolo) न्यूजची दोन आठवडे जुनी बातमीही सापडली. मग या लग्नात उपस्थित फोटोग्राफरच्या हवाल्याने संपूर्ण किस्सा सांगितला.
खरं तर अब्दुलने आपल्या आईशी लग्न केलेलं नाही, तर तिचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. गेल्या १८ वर्षांपासून मी तिला माझ्या क्षमतेनुसार विशेष आयुष्य देण्याचा प्रयत्न केला आहे कारण तिने आपले संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी अर्पण केले आहे परंतु शेवटी, ती तिच्या शांत जीवनास पात्र आहे म्हणून, एक मुलगा म्हणून मला वाटते की मी योग्य काम केले. मी माझ्या आईला १८ वर्षांनंतर प्रेम आणि आयुष्यात दुसरी संधी घेण्यास मदत केली. अब्दुलला दोन भाऊ असून त्याच्या आईने सिंगल मदर म्हणून त्याचे संगोपन केले.
संबंधित बातम्या