Fact Check : पीओकेमध्ये भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ आणि संविधानाच्या घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले पुढे
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : पीओकेमध्ये भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ आणि संविधानाच्या घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले पुढे

Fact Check : पीओकेमध्ये भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ आणि संविधानाच्या घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले पुढे

May 28, 2024 02:01 PM IST

Fact Check POK Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे मुस्लिम भारतीय सैन्याला पाठिंबा देण्याची शपथ घेत आहेत. आज तकच्या फॅक्ट चेक टीमने याबाबत तथ्य तपासणी केली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे मुस्लिम भारतीय सैन्याला पाठिंबा देण्याची शपथ घेत आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे मुस्लिम भारतीय सैन्याला पाठिंबा देण्याची शपथ घेत आहेत.

Fact Check POK Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे मुस्लिम नागरिक भारतीय लष्कराला पाठिंबा देण्याची शपथ घेत आहेत. तसेच भारतीय संविधानाचे वाचन करतांना दिसत आहे. हा व्हिडिओ एक्सवर शेअर करताना एका यूजरने लिहिले की, "भारतात समाविष्ट होण्यासाठी पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिक हे भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास भारतीय सैन्याला मनापासून पाठिंबा देतील. याची शपथ तेथील नागरिक घेत आहेत. जे ७० वर्षात शक्य झाले नाही. ते आता सहज घडत आहे, तर दुसरीकडे भारतात वाढलेले काही देशद्रोही भारताचे अन्न खाऊन पाकिस्तानसाठी भुंकतात." असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

व्हायरल व्हिडिओ देखील त्याच कॅप्शनसह फेसबुकवर शेअर केला जात आहे. या व्हिडिओ मागचे सत्य पडताळणी आज तकच्या फॅक्ट चेक टीमने केली आहे. आज तक फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की 'भारतीय सैन्याला पाठिंबा देण्याची शपथ घेणारे हे लोक पीओकेचे नसून भारतातील उरी शहरातील आहेत.

Fact Check POK Viral Video
Fact Check POK Viral Video

या पद्धतीने सत्य झाले उघड

आज तकच्या टीमच्या लक्षात आले की व्हायरल व्हिडिओच्या २० सेकंद झाल्यावर एका ठिकाणी एक व्यक्ती "गुजर बकरवाल झिंदाबाद" लिहिलेला फलक हातात धरून दिसत आहे. या फलकावर लिहिलेल्या मजकुराचा आधार घेत संबंधित कीवर्ड सर्च करून, आज तकच्या टीमने हा व्हिडिओ शोधून काढला आहे. हा व्हिडिओ १९ ऑगस्ट २०२३ रोजी एक्सवर पोस्ट केलेला आढळला. व्हिडिओसह पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "जम्मू आणि काश्मीरचे गुर्जर बकरवाल त्यांच्या अनुसूचित जमातीच्या दर्जाच्या संरक्षणाबाबत त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्याची शपथ घेत आहेत. त्यांनी सशस्त्र दलांसोबत शत्रूंपासून देशाचे रक्षण करण्याची शपथही घेतली आहे. ""जय हिंद."

 

Fact Check POK Viral Video
Fact Check POK Viral Video

जम्मू आणि काश्मीरमधील गुर्जरबाकरवाल त्यांच्या अनुसूचित जमातीच्या दर्जाच्या संरक्षणाबाबत त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे रक्षण करण्याची शपथ घेत आहेत. सशस्त्र दलांसोबत शत्रूंपासून देशाचे रक्षण करण्याची शपथ देखील त्यांनी घेतली आहे. या ट्विटमध्ये जय हिंद@rashtrapatibhvn @PMOIndia @MukhiyajiGurjar pic.twitter.com/PVQ4KNOZ9X असे लिहिले आहे.

या व्हिडिओबद्दल थोडे अधिक संशोधन केल्यानंतर, आजतकला यूट्यूबवर देखील हा व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ २० ऑगस्ट २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता. गुर्जर बकरवाल समाजाच्या लोकांनी ऑगस्ट २०२३ मध्ये ही शपथ घेतली होती, असे लिहिले आहे.

आज तकला २१ ऑगस्ट २०२३ रोजीची एक फेसबुक पोस्ट सापडली ज्यामध्ये रफिक बलोटे यांच्या नावाचा उल्लेख आहे. कीवर्ड शोधत असताना, टीमला १० डिसेंबर २०२२ चा अहवाल सापडला, ज्यानुसार रफिक बलोटे हे उरीच्या ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष असल्याची माहिती उघड झाली आहे.

२०२३ मध्येही हा व्हिडिओ बंगाली भाषेत याच दाव्याने व्हायरल झाला होता. त्यावेळी देखील या व्हिडिओची सत्य तपासणी करण्यात आली होती, त्यादरम्यान आजतकची टीम रफिक बलोटे यांच्याशी बोलली. रफिकने आज तकला सांगितले की, व्हिडिओमध्ये ते स्वत: शपथ घेत होते. ते म्हणाले होते, "आम्ही, गुर्जर-बकरवाल समाजाचे लोक एकत्र आलो असून आणि आमचा अनुसूचित जमातीचा दर्जा वाचवण्याच्या उद्देशाने आम्ही संविधानाची शपथ घेतली आणि भारतीय लष्कराला पाठिंबा दिला. हा व्हिडीओ आहे डाक बांगला भागातील. बारामुल्ला जिल्हा येथील आहे.

रफिकने असेही म्हटले होते की, आम्ही आयुष्यभर आपल्या देशावर प्रेम केले आहे, हे खूप दुर्दैवी आहे की काही लोक आम्हाला पीओकेतील नागरिक संबोधित आहेत. ऑगस्ट २०२३ मध्ये केंद्र सरकारने पहारी समाजाच्या लोकांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केल्यामुळे गुर्जर बकरवाल समाजाचे लोक आंदोलन करत होते. तथापि, हे विधेयक डिसेंबर २०२३ मध्ये दोन्ही सभागृहात मंजूर झाले. भारतीय लष्कराच्या समर्थनार्थ शपथ घेणारे हे लोक पीओकेचे नसून भारतातील उरी शहरातील आहेत हे सत्य तपासणीत उघड झाले आहे.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Aaj Takने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर