mallikarjun kharge fake video: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही क्लिप बनावट आणि खोटी असल्याचे फॅक्ट चेकमध्ये पुढे आली आहे. एका व्हीडिओत खर्गे हे पंडित नेहरू बद्दल बोलतांना दिसत आहेत. नेहरूंच्या "श्रीमंत अधिक श्रीमंत" आणि "गरीब अधिक गरीब" या स्वप्नाचा उल्लेख करताना ते या व्हीडिओत दिसत आहे. या व्हिडिओवरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होते. मात्र, विश्वास न्यूजने या मागचे खरे समोर आणले आहे. खर्गे यांनी खरे तर नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांचे हे वक्तव्य मोदी सरकार विरोधात होते. मात्र, हा व्हिडिओ मॉर्फ करून त्याचा संदर्भ बदलण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यात मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात दावा केला जात आहे की एका निवडणूक रॅलीत त्यांनी नेहरूंचा उल्लेख केला. नेहरूंना देशातील “गरीबाला अधिक गरीब” आणि श्रीमंत व्यक्तिंना अधिक श्रीमंत बनवायचे आहेत.
विश्वास न्यूजने या बाबतचे सत्य तपासले आहे. यात हा व्हिडिओ फेक असल्याचे पुढे आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. मूळ व्हिडिओमध्ये खर्गे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओतुण हा संदर्भ काढून टाकण्यात आला आहे, त्यामुळे त्याचा अर्थ बदलत आहे. आर्थिक समानतेच्या धोरणांना चालना देण्याच्या संदर्भात नेहरूंचा उल्लेख करून खरगे यांनी एका व्हायरल वक्तव्याद्वारे नरेंद्र मोदी सरकार आर्थिक विषमतेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता.
सोशल मीडियावर ‘राजनीती_सॉलिटिक्स’ने व्हायरल व्हिडिओ (संग्रह लिंक) शेअर केला आहे, ज्यावर लिहिले आहे की, “नेहरूजींचे एक स्वप्न होते, गरीब खूप गरीब झाले. आणि श्रीमंत खूप श्रीमंत” हा व्हिडिओला दोन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील यूझर्सने (आर्काइव्ह लिंक) ही व्हिडिओ क्लिप समान दाव्यांसह शेअर केली आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिप काही सेकंदांची आहे, ज्यामध्ये खर्गे हे बोलताना ऐकू येतात, “….गरीब खूप गरीब झाले…श्रीमंत अधिक श्रीमंत झाले हे नेहरूजींचे स्वप्न होते.” असे या व्हिडिओत खर्गे बोलतांना दिसत आहेत.
हे स्पष्ट आहे की व्हायरल होत असलेल्या ही क्लिप हा व्हिडिओचा मोजका भाग आहे, जो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे. हा मूळ व्हिडिओ पाहिल्या आणि ऐकल्याशिवाय त्याचा संदर्भ समजू शकत नाही.
मूळ व्हिडिओ शोधण्यासाठी, विश्वास न्यूजने Invid च्या मदतीने या व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्स काढल्या आणि रिव्हर्स इमेज सर्च केले. हा शोध घेत असतांना ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ च्या अधिकृत YouTube चॅनेलवर अपलोड केलेला मूळ व्हिडिओ सापडला, जो ५ मे रोजी शेअर करण्यात आला होता.
व्हायरल झालेला व्हिडिओ खर्गे यांच्या बंगालमधील निवडणूक कार्यक्रमाचा आहे, ज्यामध्ये ते नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर निशाणा साधतात त्यांच्यावर टीका करतांना दिसतात. (२१.४०/४१.१७ फ्रेम), “...पंडित जवाहरलाल नेहरू जी एक गोष्ट म्हणाले होते...मी इथे आहे. मी त्याचा उल्लेख करतो. देशाचे रक्षण, देशाची प्रगती, देशाची एकता, हे आपल्या सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे ते म्हणाले होते. कोण म्हणाले...पंडित जवाहरलाल नेहरूजी म्हणाले...आपण वेगवेगळ्या धर्माचे पालन करू शकतो...वेगवेगळ्या राज्यांत राहतो...वेगवेगळ्या भाषा बोलू शकतो पण आपल्यात जाती भेदाच्या आणि धर्माच्या भिंती उभ्या करू नये. आपल्या देशातील काही लोक खूप श्रीमंत आणि बहुतेक लोक गरीब असावेत असे आपल्याला वाटत नाही. हे नेहरूजींचे स्वप्न होते. "गरीब खूप गरीब होतात आणि श्रीमंत खूप श्रीमंत होतात... आता हेच होत आहे." यानंतर खर्गे यांनी मोदी सरकारवर आर्थिक विषमतेला चालना देत असल्याचा आरोप करत भूतकाळातील काँग्रेस सरकारांच्या कामगिरीचा उल्लेख करून .मोदीजींचे विचार नेहरूजींच्या विरुद्ध आहेत अशी टीका केली.
या व्हायरल क्लिपबाबत विश्वास न्यूजने उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अभिमन्यू त्यागी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पुष्टी केली की ही एक बनावट क्लिप आहे, ज्याद्वारे निवडणुकीत कॉँग्रेसची प्रतिमा मुद्दामून डागाळली जात आहे.
ज्या युजरने व्हायरल व्हिडिओ फेक क्लेम्ससह शेअर केला आहे, त्याला इंस्टाग्राम अकाऊंटला सुमारे नऊ लाख लोक फॉलो करतात. निवडणुकांशी संबंधित इतर दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट दाव्यांची चौकशी करणारे तथ्य तपासणी अहवाल विश्वास न्यूजने पुढे आणले आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार (संग्रहण लिंक) लोकसभा निवडणुकीच्या अंतर्गत आतापर्यंत चार टप्प्यात मतदान झाले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे, ज्यामध्ये एकूण ४९ जागांवर मतदान होणार आहे. आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे मतदांन होणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची ही क्लिप बदललेली आणि बनावट आहे, ज्यामध्ये ते नेहरूंच्या “श्रीमंत अधिक श्रीमंत” आणि “गरीब अधिक गरीब” या स्वप्नाचा उल्लेख करताना ऐकू येतात. खरे तर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला दोष देत हे विधान केले होते, परंतु व्हायरल क्लिपमध्ये हा संदर्भ गायब आहे, त्यामुळे व्हिडिओचा अर्थ बदलत आहे.
(डिस्क्लेमर: ही मूळ बातमी www.vishvasnews.comमध्ये प्रकाशित झाली आहे. एचटी मराठीने शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून ही बातमी पुर्नप्रकाशित केली आहे.)