मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: मोहन भागवत यांनी काँग्रेसचं कौतुक केलं? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Fact Check: मोहन भागवत यांनी काँग्रेसचं कौतुक केलं? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

May 24, 2024 05:24 PM IST

Mohan Bhagwat Viral Video: मोहन भागवत यांनी काँग्रेसचे कौतुक करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मोहन भागवत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मोहन भागवत यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Fact Check News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोहन भागवत काँग्रेसचं कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडिओत मोहन भागवत बोलतात की, आपल्या देशातील लोकांमध्ये राजकीय बुद्धिमत्ता कमी आहे, सत्ता कोणाकडे आहे, याचे महत्त्व त्यांना कमी माहिती आहे, आपण आपल्या देशातील लोकांमध्ये राजकीय जागृती केली पाहिजे, म्हणून संपूर्ण देशात काँग्रेसच्या रूपाने एक मोठी चळवळ उभी राहिली.” यासोबतच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणतात.

ट्रेंडिंग न्यूज

हा व्हिडिओ शेअर करताना एका एक्स वापरकर्त्याने लिहिले की, “पाचव्या टप्प्यानंतर आरएसएसचे मोहन भागवत यांनाही काँग्रेसचे योगदान आठवू लागले! मोदी जात आहेत. इंडिया आघाडीचे सरकार येत आहे." हा व्हायरल व्हिडीओ फेसबुकवरही याच दाव्याने शेअर करण्यात आला आहे. तुम्ही या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहू शकता. मात्र, या व्हिडिओ मागील सत्य समोर आले आहे. हा व्हिडिओ ६ वर्ष जुना आहे. या व्हिडिओचा लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.

जाणून घ्या सत्य

हा व्हिडिओ हिंदुस्थान टाइम्सच्या युट्यूब चॅनेलवर १८ डिसेंबर २०१८ रोजी अपलोड करण्यात आला होता. २०१८ मध्ये दिल्लीत आरएसएसच्या ३ दिवसीय व्याख्यानमालेदरम्यान मोहन भागवत यांनी हे विधान केले होते, असे सांगण्यात आले. भागवतांचे हे विधान अलीकडच्या काळातील नसून २०१८ सालातील आहे, हे यावरून सिद्ध होते. सन २०१८ मध्ये १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान आरएसएसने दिल्लीतील विज्ञान भवन येथे "फ्यूचर इंडिया" नावाची व्याख्यानमाला आयोजित केली होती. जे १७ सप्टेंबर २०१८ रोजी आरएसएसच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीम करण्यात आले. मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर २०१८ रोजी हे भाषण केले. या भाषणाच्या व्हिडिओमध्ये मोहन भागवत स्वातंत्र्य चळवळीबद्दल बोलतात. तसेच काँग्रेस पक्षाने देशातील सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी करून घेण्याचे काम केले आणि स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान आहे, असेही ते बोलतात.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंहचा नरेंद्र मोदींना टोला

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी २१ मे २०२४ रोजी त्यांच्या एक्स अकाउंटवर व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता. दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर निशाणा साधत व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “ नरेंद्र मोदी आणि अमित शाहजी कृपया काँग्रेसबद्दल आरएसएसचे सरसंघचालक यांचे मत ऐका. काँग्रेसने देशासाठी काहीही केले नाही, असे म्हणणे बंद करा."

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग