मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact check : निवडणूक आयोगाने जनतेच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला? काय आहे सत्य

Fact check : निवडणूक आयोगाने जनतेच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला? काय आहे सत्य

THIP Media HT Marathi
May 30, 2024 02:00 PM IST

Election Commission : निवडणूक आयोगाने लोकांसाठी संपूर्ण भारतात मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही या पोस्टची पडताळणी केल्यानंतर आढळले की, हा दावा खोटा असून व्यंग्यात्मक(satire)श्रेणीतील आहे.

निवडणूक आयोगाने  जनतेच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला? 
निवडणूक आयोगाने  जनतेच्या मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा प्रस्ताव दिला? 

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, भारतीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी पाहून लोकांसाठी संपूर्ण भारतात मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही या पोस्टची पडताळणी केल्यानंतर आढळले की, हा दावा खोटा असून व्यंग्यात्मक (satire) श्रेणीतील आहे. X वरील एका पोस्टच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, भारतीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदान टक्का पाहून लोकांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

तथ्य पडताळणी - 

भारतीय निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे? 

भारतीय निवडणूक आयोग एक स्‍वायत्त संविधानिक संस्था आहे, जिच्यावर भारतात व राज्यात निवडणूक प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी आहे.  ही संस्था भारता लोक सभा, राज्‍य सभा, राज्‍यांतील विधान सभा, देशात राष्‍ट्रपती व उप-राष्‍ट्रपतींच्या पदासाठी निवडणूक राबवते. 

याची स्थापना २५ जानेवारी, १९५० रोजी संविधानातील तरतुदीनुसार केली होती  (हा दिवस राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो.).  आयोगाचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. भारतीय संविधानाचा भाग XV (अनुच्छेद ३२४-329) चुनाव आयोगाविषयी माहिती देतो.

लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत किती टप्प्यातील मतदान झाले आहे? 

यंदा सात टप्प्यात निवडणुका होत आहेत. सर्व जागांवरील मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे. 

  1. पहिला टप्पा – १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडला. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिवूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडु, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप, पुद्दुचेरी येथील एकूण १०२ जागांवर मतदान झाले. 
  2. दूसरा टप्पा – २६ एप्रिल रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीरमधील एकूण ८९ जागांवर मतदान झाले. 
  3. तिसरा टप्पा- ०७ मे रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादर नगर हवेली आणि दमण दीव येथील एकूण ९४ जागांवर मतदान झाले. 
  4. चौथा टप्पा -१३ मे रोजी आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगाना, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीरमधील ९६ जागांवर मतदान पार पडले. 
  5. पाचवा टप्पा – २० मे रोजी छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रेदश, पश्चिम बंगाल, जम्मू कश्मीर, लडाख येथील ४९ जागांवर मतदान पार पडले.
  6. सहावा टप्पा – २५ मे रोजी बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील एकूण ५७ जागांवर मतदान पार पडले.
  7. सातवा टप्पा -१  जून रोजी बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, चंडीगडमधील एकूण ५७ जागांवर मतदान पार पडणार आहे. 

 

 पहिल्या टप्प्यातील मतदान  १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडले असून तसेच सहा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सातव्या व अंतिम टप्प्यातील मतदान ०१ जून २०४ रोजी होणार आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पाचव्या टप्प्यातील मतदानात रात्री ११.३० वाजेपर्यंत जवळपास 60.09% मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या चार टप्प्यात ६6.95% मतदान, चौथ्या टप्प्यात रात्री ११.४५ वाजेपर्यंत 67.25%, , तिसऱ्या टप्प्यात  65.68% , दूसऱ्या टप्प्यात 66.71%  आणि पहिल्या टप्प्यात 66.14%  मतदान झाले आहे. मतदानाची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइट वर उपल्बध आहे. 

काय निवडणूक आयोगाने लोकांच्या मानसिक आरोग्यबाबत कोणता प्रस्ताव दिला आहे?

बिल्कुल नाही - निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर याच्याशी संबंधित कोणतीही माहिती नाही. तसेच त्यांच्या अधिकृत प्रोफाइलमध्ये याबाबत कोणते दिशा निर्देश जारी केले आहेत. या दाव्याला पोस्ट करणाऱ्या प्रोफाइलची पडताळणी केल्यावर समजते की, या प्रोफाइल द्वारे अधिकांश व्यंग्यात्मक टिप्पणी करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. वास्तवात या दाव्यांमध्ये कोणतेही सत्य नसते. याचा एक कारण सोशल मीडिआवर अधिक likes मिळवणे आहे. 

या प्रोफाइलचे नाव The Needle आहे आणि या प्रोफाइलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाद्वारे मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन केंद्रासबंधित दावा २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.१७ वाजता केला आहे. २३ मे २०२४ पर्यंत ९६४ लोकांनी पाहिले होते. 

ही प्रोफाइल भ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसारित करणारी प्रोफाइल दिसते. कारण यातील ३ एप्रिल २०२४ रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, चीन द्वारे अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे बदलल्यानंतर, भारतीयांनी प्रत्युत्तरादाखल हक्का नूडल्सचे नाव बदलून चक्का नूडल्स केले आहे. मात्र अशा प्रकारचे कोणतेही वृत्त आढळले नाही. त्यांची वेबसाइट  https://www. theneedle.in/ ही अजूनपर्यंत लाइव झालेली नाही. 

या तथ्यांच्या आधारावर म्हटले जाऊ शकते की, भारतीय निवडणूक आयोगा द्वारे मतदारांसठी संपूर्ण भारतात मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव फेक आहे. याआधीही आम्ही निवडणूक संबंधित अनेक दाव्यांची  तपासणी केली आहे.

(डिस्क्लेमर: हे मूळ वृत्त THIP Media ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

टी-२० वर्ल्डकप २०२४