Government Schemes News: देशभरातील विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यासाठी केंद्र सरकार नवी योजना आणली आहे, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत सरकारने पीएम फ्री लॅपटॉप स्कीम २०२४ योजना आणली आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येत आहेत, असे सांगण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकारने खरोखरच अशी योजना आणली आहे का? पीआयबीने यामागचे सत्य शोधून काढले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्टमध्ये एका यूट्यूब व्हिडिओच्या थंबनेलचा फोटो दिसत दिसत आहे. या फोटोमध्ये 'फ्री लॅपटॉप स्कीम २०२४… या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप मिळणार' असे लिहिले आहे. . त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो दिसत आहे. तसेच काही मुले हातात लॅपटॉप घेऊन बसलेले पाहायला मिळत आहे.
या पोस्टबाबत पीआयबी फॅक्ट चेकने सत्य तपासले असता, केंद्र सरकारने अशी कोणतीही योजनाआणलेली नाही. विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचा दावा करणारी पोस्ट खोटी आहे. अशा खोट्या दाव्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. अशा अफवांना बळी पडल्यास नागरिकांची मोठी फसवणूक होऊ शकते, अशी माहिती पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून दिली.
युट्यूब चॅनेलने व्हिडिओ थंबनेलमध्ये दिशाभूल करणारा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्र सरकारने 'वीज बिल माफी योजना' आणली आहे. त्याअंतर्गत सर्व लोकांचे संपूर्ण वीजबिल माफ करण्यात येणार आहे. मात्र, हा दावाही खोटा असून सरकारकडून तशी कोणतीही योजना आणली गेली नाही. त्यामुळे अशा फेक चॅनेल्स आणि त्यांच्या खोट्या दाव्यांपासून सावध राहिले पाहिजे.
बेरोजगार तरुणांना दरमहा साडेतीन हजार रुपये दिले जातील, असा दावा करणारी आणखी एक पोस्ट व्हायरल होत आहे. पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजना २०२२ साठी नोंदणी सुरू झाली आहे, या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा ३ हजार ५०० रुपये दिले जातील, असा दावा केला जात आहे. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, ज्यावर क्लिक करून मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जात आहे. मात्र, भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालविली जात नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे केल्यास आपल्या खात्यातील पैसे गायब होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या