Viral News: भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी हे एकमेव व्यक्ती आहेत, जे भारताला एक चांगले राष्ट्र बनवू शकतात. कारण त्यांच्यात देशवासीयांच्या फायद्याचे निर्णय घेण्याची क्षमता आहे. ते नवी दिशा देऊ शकतात, या शब्दात प्रतिमाताई पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे कौतूक केल्याचा दावा व्हायरल मेसेजच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र, या व्हायरल मेसेजमागील सत्य तपासले असता हा दावा खोटा असल्याचे उघड झाले. प्रतिभाताई पाटील यांनी मोदींबाबत असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्याचे सत्य जाणून एका न्यूज वेबसाईने संबंधित कीवर्डसह गूगलवर सर्च केला. मात्र, त्यांना या व्हायरल दाव्याशी संबंधित कोणताही विश्वासार्ह मीडिया अहवाल सापडला नाही. प्रतिभाताई पाटील यांनी मोदींबाबत असे विधान केले असते तर, त्याची बातमी प्रसारमाध्यमांत झळकली असते.रंतु व्हायरल दाव्याची सत्यता सिद्ध करणारा कोणताही अहवाल आढळला नाही.
या व्हायरल दाव्याबाबत प्रतिभाताई पाटील यांचे अधिकृत सोशल मीडिया खाते देखील शोधण्यात आले. मात्र, प्रतिभा पाटीलताई यांचे कोणतेही अधिकृत सोशल मीडिया खाते सापडले नाही. या दाव्याची पुष्टी करण्यासाठी संबंधित न्यूज वेबसाईटने प्रतिभाताई पाटील यांच्या खासगी सचिवांशी संपर्क साधला. ही पोस्ट पूर्णपणे बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही. त्याचे सोशल मीडियावर कोणतेही खाते नसल्याचेही त्यांच्या सचिवांनी सांगितले.
भारतामध्ये १९ एप्रिल ते ०१ जून या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे , अशी घोषणा निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी केली. मात्र, तेव्हापासून सोशल मीडियावर अनेक खोटे दावे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर 'चॅलेंज व्होट' आणि 'टेंडर्ड व्होट'बद्दल मॅसेज व्हायरल झाला होता. मतदार यादीत तुमचे नाव नसल्यास तुम्ही आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्राच्या आधारे कमल ४९ अंतर्गत चॅलेंज व्होट पर्यायाद्वारे मतदान करू शकतात, असा दावा व्हायरल मॅसेजमध्ये केला जात होता. मात्र, हा दावा खोटा आहे, अशी माहिती समोर आली.