मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Jun 12, 2024 12:13 PM IST

Rahul Gandhi Fact Check : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्यांच्या सर्व सभांमध्ये चीनचे संविधान असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे, परंतु आज तकने केलेल्या फॅक्ट चेक टीमने हे दावे खोटे असल्याचे शोधून काढले आहे.

प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड
प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड

Rahul Gandhi Fact Check : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्यांच्या सर्व सभांमध्ये भारताचे संविधान घेऊन जातात. त्यांच्या रॅलींमध्ये, लाल कव्हर असलेले संविधानाचे पुस्तक घेऊन जातात आणि ते त्यांच्या समर्थकांना दाखवतात. हे पुस्तक प्रत्यक्षात चीनचे संविधान असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे, परंतु आज तकने केलेल्या फॅक्ट चेक टीमने हे दावे खोटे असल्याचे शोधून काढले आहे.

ट्रेंडिंग न्यूज
Rahul Gandhi Fact Check
Rahul Gandhi Fact Check

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी सरकार भारताचे संविधान बदलणार असल्याचा आरोप ते सातत्याने करतात. यासाठी ते त्यांच्या प्रत्येक सभा आणि रॅलीमध्ये भारताच्या संविधानाची लाल रंगाची प्रत घेऊन सोबत फिरत असतात. मात्र, ही प्रत भारताच्या संविधानाची नसून चीनच्या संविधानाची असल्याचा विरोधकांनी आरोप केला असून या संदर्भातील केक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. राहुल गांधी हे त्यांच्या रॅलीत खरचं चीनचे संविधान घेऊन जातात का? असा सवाल अनेक जण विचारू लागले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पाचव्या टप्प्याच्या आधी, राहुल गांधींबद्दलचा हा दावा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधी हे त्यांच्या रॅलींमध्ये चीनचे संविधान घेऊन जातात, असा हल्लाबोल त्यांच्या विरोधकांनी केला आहे. सोशल मिडियावर फिरत असलेल्या व्हिडिओ आणि फोटोत राहुलच्या हातात लाल पुस्तक असल्याचे दिसत आहे. या लाल पुस्तकाला चीनचे संविधान असल्याचा आरोप केला जात आहे.

हे छायाचित्र शेअर करताना एका फेसबुक युजरने लिहिले की, "राहुल गांधी चीनचे संविधान सोबत ठेतवतात का? भारताच्या राज्यघटनेचे मुखपृष्ठ निळे आहे. चीनच्या राज्यघटनेचे मुखपृष्ठ लाल आहे. राहुल गांधींनी राज्यघटनेला लाल कव्हर घातले आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

या बाबत आसामचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विट केले आहे. १७ मे रोजी एका ट्विटमध्ये त्यांनी हातात लाल पुस्तक घेऊन राहुल यांचा फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते, "राहुल गांधी चीनचे संविधान घेऊन फिरतात का?"

मात्र, आज तकच्या फॅक्टचेक टीमने याचे सत्य पुढे आणले आहे. राहुल गांधी हे त्यांच्या रॅलीमध्ये चीनचे नव्हे तर भारताचे संविधान दाखवतात असे आज तकच्या फॅक्टचेकच्या टीमने म्हटले आहे. लाल कव्हर असलेली ही राज्यघटना 'इस्टर्न बुक कंपनी' (EBC) द्वारे प्रकाशित केलेली पॉकेट आवृत्ती आहे.

या पद्धतीने जाऊन घेतले सत्य

राहुल गांधींचे व्हायरल चित्राचा शोध घेलयास त्यात 'बिझनेस स्टँडर्ड'चा एक अहवाल सापडला ज्यामध्ये तेच चित्र वापरले गेले होते. या वृत्तात असे सांगण्यात आले आहे की, हे चित्र तेलंगणातील गडवाल येथे ५ मे रोजी झालेल्या सभेचे आहे.

या माहितीच्या आधारे शोध घेतल्यानंतर आजतकच्या टीव्ही ९ आणि तेलुगू'च्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर राहुल गांधींच्या गडवाल सर्वसाधारण सभेचा व्हिडिओ सापडला. या व्हिडिओमध्ये, १:०२:०९ च्या चिन्हावर, राहुल गांधी त्यांच्या हातात लाल पुस्तक धरलेले दिसत आहेत. नीट पाहिलं तर या पुस्तकावर इंग्रजीत "भारतीय संविधान" लिहिलेलं होतं. खाली दिलेल्या चित्रात राहुलच्या हातात भारतीय राज्यघटना दिसत आहे.

संविधान दाखवत राहुल गांधी म्हणतात की जनतेला जे काही अधिकार मिळाले आहेत ते या संविधानामुळे मिळाले आहेत. यासोबत राहुल भाजपला राज्यघटना संपवायची आहे, असे आरोप देखील सातत्याने करत आहेत. राहुल गांधी आपल्या भाषणात दाखवत असलेले लाल पुस्तक हे चीनचे नसून भारताचे संविधान आहे हे येथेच स्पष्ट झाले.

Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल यांनी हे लाल झाकलेले संविधान एकापेक्षा जास्त भाषणात दाखवल्याचे आपण पाहिले. ६ मे रोजी राहुल यांनी मध्य प्रदेशातील अलीराजपूरमध्येही हेच संविधान दाखवले होते. अलीकडेच १८ मे रोजी दिल्लीतील चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातील अशोक विहारमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल यांनी हेच संविधान दाखवले होते.

कीवर्ड सर्चच्या सहाय्याने शोध घेतल्यावर आज तकला आढळले की लाल कव्हर असलेले संविधान हे भारतीय राज्यघटनेचे 'कॉट पॉकेट एडिशन' आहे, जे 'ईस्टर्न बुक कंपनी' अर्थात ईबीसी पब्लिकेशन्सने प्रकाशित केले आहे. आम्हाला 'ईबीसी' वेबस्टोअरच्या वेबसाइटवर देखील हे संविधान सापडले जे ऑनलाइन ऑर्डर करून खरेदी केले जाऊ शकते.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Aaj TAk ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग