PM Modi: भाजपचा विजय साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व भारतीय युजर्सना ७१९ रुपयांचा ८४ दिवस मोफत रिचार्ज देत आहेत. आम्हाला हा दावा व्हाट्सएप टिप लाइन (९९९९४९९०४४) वर देखील प्राप्त झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यांतर नरेंद्र मोदींनी भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देण्याची घोषणा केल्याचा दावा केला जात आहे. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही गूगलवर काही कीवर्ड शोधले. आम्हाला दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही विश्वसनीय माहिती सापडली नाही.
पुढे तपासात आम्ही नरेंद्र मोदी आणि भाजपचे अधिकृत सोशल मीडिया खाते आणि भाजपची अधिकृत वेबसाइट शोधली. परंतु, या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही माहिती आढळली नाही. आता आम्ही सोशल मीडियावर शेअर केल्या जात असलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर आम्ही ‘mahirfacts’ नावाच्या वेबसाइटवर पोहोचलो. ही वेबसाइट आम्हाला संशयास्पद वाटली म्हणून आम्ही ती स्कॅम डिटेक्टरवर तपासली. स्कॅम डिटेक्टरने वेबसाइटचे वर्णन असुरक्षित आणि धोकादायक असे केले.
पुढील तपासात, जेव्हा आम्ही या वेबसाइटवर रिचार्जचा लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या बटणावर क्लिक केले, तेव्हा आम्हाला आढळले की ही एक फिशिंग लिंक आहे, जी ब्लॉग स्पॉटच्या वेबसाइटवर जाते. ब्लॉग स्पॉटच्या मदतीने तयार केलेल्या या पृष्ठावर युजर्सना त्यांचा मोबाइल नंबर विचारला जातो.
आमच्या तपासातून आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, नरेंद्र मोदींनी भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व भारतीय वापरकर्त्यांना मोफत रिचार्ज दिल्याचा व्हायरल दावा खोटा आहे. आम्ही आमच्या वाचकांना आवाहन करतो की कृपया कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. अशा लिंकर धोकादायक असू शकतात.
डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात News Checker ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.
संबंधित बातम्या