Ayodhya Ram Mandir Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी श्री राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर श्री राम मंदिरात भाविकांना रामलल्लांचे दर्शन घेता येणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत. याचदरम्यान, या मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यात श्रीरामाच्या मूर्तीच्या डोळ्यांची हालचाल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहे. या व्हिडिओमागचे सत्य समोर आले आहे.
सध्या सोशल मीडियावर अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या व्हिडिओ धुमाकूळ घातले आहे. ज्यात श्रीरामाची मूर्ती स्मित हास्यासह दोन्ही बाजूला पाहत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. मात्र, या व्हिडिओबाबत अधिक माहिती मिळवली असता हा व्हिडिओ खोटा असल्याचे सिद्ध झाले. हा व्हायरल व्हिडिओ एआयचा वापर करन बनवण्यात आला आहे. यामुळे भाविकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाल्यानंतर त्यांचा पहिली फोटो समोर आला होता. त्यात श्रीराम यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, गळ्यात मोत्याचा हार आहे, कानात झुमके, हातात सोन्याचे धनुष्य आणि बाण दिसत आहे. रामलल्ला यांना पिवळ्या रंगाचे पितांबर नेसवले होते.
आजपासून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. रामभक्तांसाठी सकाळी ७.०० दुपारी ११.३० वाजेपर्यंत राम मंदिर खुले राहणार आहे. ११.३० वा. ते दुपारी ०१.५९ मंदिराच्या गर्भगृहाचे दरवाजे बंद रहाणार आहेत. दिवसा दुपारी २ सायं ७ वाजेपर्यंत पुन्हा भक्तांसाठी राम मंदिर खुले होईल. दुपारी अडीच तास राम मंदिराचे दरवाजे बंद रहाणार आहेत. दिवसातून तीन वेळी आरती केली जाणार आहे. पहिली जागरण श्रृंगार आरती सकाळी ६.३० वाजता होईल. दुसरी भोग प्रसाद आरती दुपारी १२.०० वाजता होईल आणि तिसरी संध्या आरती सायंकाळी ७.३० वाजता होईल.