लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ५ जून रोजी NDA नरेंद्र मोदी यांची एकमताने रालोआच्या नेतेपदी निवड करण्याचा ठराव संमत केला. नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी ३.० सरकारचा मार्ग मोकळा झाला. यावेळी टीडीपीने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने, आंध्र प्रदेशातीलआंदोलकांनी चंद्राबाबू नायडू यांच्या छायाचित्राची मोडतोड करून ते पेटवून दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्सनी ३३ सेकंदांचे फुटेज शेअर करत दावा केला की, “टीडीपीने एनडीएला पाठिंबा दिल्याने आंध्र प्रदेशातील लोक संतप्त झाले असून आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडून चंद्राबाबू नायडूंचे फोटो जाळले जात आहेत.”
मात्र या व्हायरल व्हिडिओची न्यूजचेकरने पडताळणी केल्यानंतर आढळले की, व्हिडिओमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश राज्य निवडणुकीसाठी गुंतकल विधानसभा मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार म्हणून गुम्मनूर जयराम यांचे नाव जाहीर केल्यानंतर TDP ने त्याचा निषेध नोंदविण्यात आला होता. त्यावेळचा तो व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्सवर Google लेन्सच्या शोधामुळे आम्हाला @SajjalaBhargava च्या २९ मार्च २०२४ रोजीच्या फेसबुक पोस्टकडे नेले. या पोस्टमध्ये व्हायरल फुटेज सोबत, “गुंतकल TDP मध्ये आग (Google द्वारे तेलुगुमधून भाषांतरित)” असे म्हटले आहे.
त्यानंतर आम्ही Google वर “गुंतकल,” “चंद्राबाबू नायडू फोटो” आणि “फायर” हे कीवर्ड टाकून शोधेल, ज्यामुळे आम्हाला मार्च 2024 चाSamayam Teluguचा व्हिडिओ मिळाला. त्यात व्हिडिओची छोटी आवृत्ती दर्शविली गेली आहे आणि लिहिले आहे की, “गुंटकल टीडीपी कार्यकर्त्यांनी चंद्राबाबू नायडूचा फोटो जाळला आणि गुम्मनूर जयरामचा निषेध केला”.
हाच व्हिडीओ त्यांच्याअधिकृत फेसबुक पेजवर२९मार्च २०२४रोजी अपलोड करण्यात आला होता.
मार्च २०२४च्या न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट दाखवण्यात आला होता, “शुक्रवारी गुंटकलमध्ये गुम्मनूर जयराम यांना पक्षाचे तिकीट जाहीर केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत TDP कॅडरने प्रचार सामग्री पेटवली.” असे त्यात म्हटलेले आहे.
त्याचच पुढे असाही दावा केला की अलीकडेच टीडीपीमध्ये सामील झालेल्या जयराम यांच्याकडून ३० कोटी रुपये घेऊन त्यांना तिकीट देण्यात आले. तिरुपती जिल्ह्यातील सत्यवेदूमध्ये, टीडीपी कॅडरने YSRC मधून अलीकडेच पक्षात सामील झालेल्या कोनेती आदिमुलम यांना उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयालाही जोरदार विरोध झाला होता.
२९मार्च२०२४च्या हिंदू मधील रिपोर्टनेही याची पुष्टी केली आणि म्हटले आहे की, “तेलगू देसम पार्टी (टीडीपी) च्या असंतुष्ट कार्यकर्त्यांनी डी. व्यंकटेश्वर प्रसाद आणि गुम्मनूर जयराम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर याचा निषेध करण्यासाठी घोषणाबाजी केली. तसेच अनंतपूर आणि गुंतकलमध्ये पक्ष कार्यालयांची तोडफोड करत फर्निचरला आग लावली. यामुळे तणाव निर्माण झाला.”
मोठ्या प्रमाणात प्रसारित फुटेज पाहिलेले स्थान Google Map वर शोधण्यात आम्ही यशस्वी झालो.
YSRCP सरकारमध्ये मंत्री असलेले Gummanur Jayaram या वर्षी मार्चमध्ये TDP मध्ये सामील झाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या आंध्र राज्य निवडणुकीत गुंतकल विधानसभा जागा जिंकली आणि ते आधी ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या उमेदवाराचा ६,८२६मतांच्या फरकाने पराभव केला.
अशा प्रकारे आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की गुम्मनूर जयराम यांना TDP उमेदवार म्हणून नामांकन केल्याबद्दल राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्रच्या गुंतकलमध्ये निषेध दर्शविणारा व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केला गेला आहे. भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल चंद्राबाबूंचा फोटो जाळल्याचा दावा खोटा आहे.
डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात News Checker ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.