मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact check : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ११० मुस्लिम खासदार निवडून आले? काय आहे व्हायरल दाव्याचं सत्य

Fact check : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ११० मुस्लिम खासदार निवडून आले? काय आहे व्हायरल दाव्याचं सत्य

Newschecker HT Marathi
Jun 13, 2024 01:55 PM IST

Muslimmp In Lok sabha : २०२४ मध्ये संसदेतील एकूण संख्याबळाच्या २० टक्के म्हणजे ११०मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा सोशल मीडियावर पोस्ट करून केला जात आहे. मात्र पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ११०  मुस्लिम खासदार निवडून आले?
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ११०  मुस्लिम खासदार निवडून आले?

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये संसदेतील एकूण संख्याबळाच्या २० टक्के म्हणजे ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा सोशल मीडियावर पोस्ट करून केला जात आहे.

 

व्हायरल होत असलेली पोस्ट
व्हायरल होत असलेली पोस्ट
ट्रेंडिंग न्यूज

ट्विटची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.

Fact check -

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी न्यूजचेकरने “मुस्लिम खासदार लोकसभा” साठी संबंधित कीवर्ड टाकून शोध घेतला. त्यानंतर आम्हाला अनेक बातम्या मिळाल्या ज्यात समजले की,या वर्षी फक्त २४ मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत, यावेळी मुस्लिम खासदारांची संख्या २०१९ च्या संख्येच्या तुलनेत २ ने कमी आहे. रिपोर्टनुसार, २०१९मध्ये ११५ मुस्लिम उमेदवारांनी निव़डणूक लढवली होती.  त्या तुलनेत २०२४ च्या लोकसबा निवडणुकीत ७८ मुस्लिम उमेदवारांनी निवडणूक लढवली.  यामध्ये काही अपक्ष उमेदवारांही समावेश आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत संपूर्ण भारतभरात ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा कोणताही रिपोर्ट आम्हाला आढळला नाही.

इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट
इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट

आता लोकसभेच्या एकूण संख्याबळात मुस्लिमांचा वाटा फक्त ४.४२ टक्केआहे, जो आतापर्यंतचा दुसरा सर्वात कमी वाटा आहे. १९८० मध्ये विक्रमी ४९ मुस्लिम खासदार (सभागृहाचे ९.०४ टक्के) निवडून आले आणि १९८४ मध्ये ४५ मुस्लिम खासदार (सभागृहाचे८.३ टक्के)निवडून आले होते. मात्र त्यानंतर लोकसभेतील मुस्लिमांची संख्या कधीही ४० च्या वर गेली नाही,” असे ८ जून २०२४ रोजीचा Indian Express चा रिपोर्ट सांगतो. एबीपी न्यूजचा तत्सम रिपोर्ट येथे पाहता येईल.

 

एबीपी न्यूजमधील रिपोर्ट
एबीपी न्यूजमधील रिपोर्ट

NDA आघाडीतील घटक पक्षांमध्ये एकही मुस्लिम खासदार नसताना, INDIA गटात ७.९ टक्के मुस्लिम खासदार आहेत. त्याचप्रमाणे,  NDA कडे एकही ख्रिश्चन खासदार नाही,  तर INDIA  आघाडीत ३.५ टक्के ख्रिश्चन खासदार आहेत.  NDA मध्ये एकही शीख खासदार नाही  तर INDIA आघाडीत शीख समुदायाचे ५ टक्के खासदार आहेत… एकूणच, यावेळी २४ मुस्लिम खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत,” असे ७ जून २०२४ रोजीचा मिंटचा रिपोर्ट सांगतो. असाच एक Print चा रिपोर्ट  येथे पाहिला जाऊ शकतो, जो दावा केल्याप्रमाणे ११० नव्हे तर २४ मुस्लिम खासदार २०२४ च्या निवडणुकीत विजयी होऊन लोकसभेवर गेले आहेत, याची पुष्टी करतो.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात News Checker ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

 

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर