मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  सावधान..! आता ‘ही’ कंपनी वाचणार तुमचे पर्सनल मेसेज, Facebook ने केली डील

सावधान..! आता ‘ही’ कंपनी वाचणार तुमचे पर्सनल मेसेज, Facebook ने केली डील

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 02, 2024 05:13 PM IST

Facebook Netflix Exchange Data : आता Facebook ने एक मोठा सौदा केला असून हा सौदा कोणत्याही वस्तूचा नसून तुमच्या माहितीची आहे. Facebook ने नेटफ्लिक्ससोबत भागीदारी केली आहे, त्याअंतर्गत प्रायव्हेट मेसेजच्या बदल्यात डाटा देण्याचा करार झाला आहे.

फेसबुककडून पर्सनल मेसेज लीक
फेसबुककडून पर्सनल मेसेज लीक

इंटरनेट पुरवठादार कंपन्या कोणावर उपकार करत नाहीत. अनेक इंटरनेट कंपन्या मोफत सेवा देतात. मात्र वास्तविक त्या फ्री मध्ये सेवा देत नसतातच. तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही फुकट सेवा घेत आहात, मात्र तुम्ही या सेवांच्या बदल्यात त्यांना आपला डाटा (वैयक्तिक माहिती) देत असता.

लोकप्रिय सोशल मीडिया प्लेटफॉर्म Facebook चे जगभरात कोट्यवधी वापरकर्ते आहेत. या प्लेटफॉर्मवर अनेक वेळा डाटा लीक केल्याचे आरोपही लागले आहेत. पुन्हा एकदा Barter Data Exchange शी संबंधित प्रकरणात होत असलेल्या चौकशीत व कोर्टातील सुनावणीवेळी मिळालेल्या माहितीने फेसबुक यूजर्सना धक्का बसला आहे. कोर्ट डॉक्यूमेंट्समधून समोर आले आहे की, फेसबुकने यूजर्सचे पर्सनल मेसेजेस थर्ड-पार्टी app शी शेअर केले आहेत. 

डाटा एक्सचेंज करण्यासाठी फेसबुकने लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म Netflix ला यूजर्सचे प्रायव्हेट मेसेजचा ऐक्सेस दिला आहे. Gizmodo च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हा खुलासा तेव्हा झाला, ज्यावेळी मेटाने आपला स्ट्रीमिंग बिझनेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी  Facebook Watch वर Red Table Talk सारखे ओरिजनल शो ऑफर केले जात होते. 

लॉसूटमध्ये समोर आलेले प्रकरण -

मेटाविरोधात दाखल केलेल्या लॉसूटमध्ये आरोप करण्यात आला होता की, त्यांचा स्ट्रीमिंग बिझनेस बंद करण्याचा निर्णय अडवर्टायजिंग पार्टनर Netflix च्या दबावात घेण्यात आला होता. लॉसूटमध्ये मेटावर कॉम्पिटीशन रोकण्यासाठी प्रॅक्टिसेज केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले होते की, अशा प्रकारचे प्रॅक्टिसेजचा चुकीचा प्रभाव सोशल मीडियामधील स्पर्धा आणि यूजर्सवर पडू शकतो. 

कोर्ट डॉक्यूमेंट्समध्ये म्हटले आहे की, नेटफ्लिक्स आणि फेसबुकमध्ये चांगले संबंध होते. कारण नेटफ्लिक्स फेसबुक प्लेटफॉर्मवर जाहिरातींसाठी मोठा खर्च करत होते. याच कारणामुळे नेटफ्लिक्सने स्ट्रीमिंग व्हिडियो मार्केटमध्ये दावेदारी सादर करण्यापासून फेसबुकला रोकले. २०१३ व त्यानंतर झालेल्या एग्रीमेंट्सनुसार फेसबुकने नेटफ्लिक्सला यूजर्सचे प्रायवेट मेसेजेसचा ऐक्सेस दिला. 

त्या बदल्यात नेटफ्लिक्सने फेसबुकला डाटा दिला व सांगितले की, त्यांचे यूजर्स प्लेटफॉर्मवर रिकमेंडेशन्सनुसार कसे इंटरॅक्ट करतात त्याचबरोबर कशा पद्धतीने आपली पसंत व नापंसतीची निवड करतात.

IPL_Entry_Point

विभाग