माय डिअर फ्रेंड म्हणत मोदींनी दिल्या ट्रम्प यांना खास शुभेच्छा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पोहोचवला पत्ररूपी संदेश
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माय डिअर फ्रेंड म्हणत मोदींनी दिल्या ट्रम्प यांना खास शुभेच्छा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पोहोचवला पत्ररूपी संदेश

माय डिअर फ्रेंड म्हणत मोदींनी दिल्या ट्रम्प यांना खास शुभेच्छा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पोहोचवला पत्ररूपी संदेश

Jan 21, 2025 06:35 AM IST

PM Modi wishes Donald Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला परराष्ट्रमंत्री जयशंकर हे भारताचे विशेष दूत म्हणून उपस्थित होते. त्यांनी पीएम मोदी यांच्या खास शुभेच्छा डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचवल्या.

माय डिअर फ्रेंड म्हणत मोदींनी दिल्या ट्रम्प यांना खास शुभेच्छा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पोहोचवला पत्ररूपी संदेश
माय डिअर फ्रेंड म्हणत मोदींनी दिल्या ट्रम्प यांना खास शुभेच्छा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पोहोचवला पत्ररूपी संदेश

PM Modi wishes Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र घेऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेला पोहोचले आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधी प्रसंगी त्यांनी मोदी यांचे पत्र ट्रम्प यांना दिले आहे. तसेच मोदी यांनी एक्सवरपोस्ट करत  ट्रम्प यांना ‘माय डियर फ्रेंड’ संबोधत शुभेच्छा दिल्या आहेत.  जयशंकर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष दूत म्हणून ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७  वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. 

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ आजपासून सुरु झाला आहे. शपथविधी होताच ट्रम्प यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली आहे. याचबरोबर मेक्सिकोच्या सीमेवरही आणीबाणी लागू केली आहे. अमेरिकेला पुन्हा शक्तीमान, वैभव प्राप्त करून देण्यासाठी देवानेच आपल्याला वाचविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. २०१७ नंतर ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे सर्वोच्च पद स्वीकारले आहे.

मोदी यांनी एक्सवर अभिनंदन माझ्या प्रिय मित्रा, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्ष पदी शपथ घेतली. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या आहेत. 

तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील या सोहळ्याला भारताचे विशेष दूत म्हणून  उपस्थित होते.  परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला विशेष दूत म्हणून  पाठवण्याची परंपरा  भारताच्या नेहमीच्या परंपरेशी सुसंगत आहे.

मे २०२३ मध्ये नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते, तर नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवच्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला तत्कालीन  विज्ञान मंत्री किरण रिजिजू उपस्थित होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.  परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा ऑक्टोबर २०२४ मध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होत्या. जून २०२२ मध्ये तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर