Train Accident : उडिशा (odisha ) राज्यातील बालासोर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्या मित्रांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला.या दुर्घटनेत दोघांनाही जीव गमवावा लागला आहे. दोन्ही तरुणांचा एक्सप्रेस खाली येईन मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या वृत्तानुसार एका तरुणाने आत्महत्या करण्यासाठी ट्रेनच्या समोर उडी मारली होती. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात दोघांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राकेश कुमार पाढी आणि त्याचा मित्र हेमंत साहू सोमवारी रात्री दंडहारीपूर रेल्वे क्रॉसिंग जवळ आले होते.त्याचवेळीपुरी हावडी एक्सप्रेस तेथून जात होती. रेल्वे गेटकीपर निरंजन बेहरा यांनी सांगितले की, एक्सप्रेस ट्रेन क्रॉसिंगहून पुढे जाण्याच्या आधी एक व्यक्ती रेल्वे ट्रॅककडे पळू लागला.
रेल्वे गेटकीपरने सांगितले की, त्याला वाचवण्यासाठी जेव्हा दुसरा तरुण त्याच्या मागे धावला तेव्हा दोघांना एक्सप्रेसने उडवले. दोघांचे मृतदेह १०० मीटरपर्यंत रेल्वेने फरफटत नेले. त्यांनी सांगितले की, असे वाटते की, त्यापैकी एक जण रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत होता. तर दुसरा व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दोघांचाही मृत्यू झाला.
भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्हिडिओत दिसते की, वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरून खाली उतरून ते काही अंतर चालून जातात व दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे होतात.या प्रकरणी वसई पोलिसात नोंद झाली असून तपास सुरू आहे. दोन जण रुळावर झोपलेले पाहून ट्रेनच्या चालकाने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली चिरडले होते.
संबंधित बातम्या