मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fireworks Factory Explosion: फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; २३ जणांचा मृत्यू

Fireworks Factory Explosion: फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; २३ जणांचा मृत्यू

Jan 18, 2024 09:10 AM IST

Thailand fireworks factory explosion: थायलंडमध्ये फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याने २३ जणांचा मृत्यू झाला.

Thailand fireworks factory explosion
Thailand fireworks factory explosion

Explosion at Fireworks Factory in Thailand: थायलंडच्या सुफान बुरी प्रांतात बुधवारी फटाके बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना थायलंडची राजधानी बँकॉकपासून ६० मैल अंतरावर असलेल्या कारखान्यात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "हा स्फोट इतका भीषण होता की, या घटनेवेळी कारखान्यात उपस्थित असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. कोणताही व्यक्ती जखमी किंवा जिवंत सापडला नाही."

हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी थायलंड पोलीस तपास करीत आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत झालेल्या फोटोमध्ये स्फोटाच्या ठिकाणी मोठी आग लागली असून धुराचे लोट दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात थायलंडमध्ये नवीन वर्ष साजरा केले जाते. या अनुषंगाने फटाक्यांना अधिक मागणी असते.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या वर्षी जुलै महिन्यात दक्षिणेकडील नाराथिवत प्रांतातील सुंगाई कोलोक शहरातील फटाक्यांच्या गोदामात झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला होता. तसेच आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते.

WhatsApp channel
विभाग