Do you Know: मुंबईतील टोरेस घोटाळ्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. याप्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहे. टोरेसने डायमंडच्या नावाखाली मोइसॅनाइटच्या खड्यांची विक्री करून आपल्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली. मोइसॅनाइटचा एक खडा भारतीय बाजारात ३०० रुपयांना मिळत असून तो ४२- ५० हजार रुपयांना विकण्यात आला. हिऱ्याचे दागदागिने खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला अगदी सावध राहूनच खरेदी केली पाहिजे. तुम्हाला कोणी खोटा हिरा देऊन लुबाडत तर नाही ना? खरा आणि खोटा हिरा कसा ओळखायचा? याबाबत जाणून घेऊयात.
डायमंड ज्वेलरी खरेदी करताना ४सी म्हणजे कट, क्लॅरिटी, कॅरेट, कलर याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. एवढेच नव्हेतर ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट नक्कीच तपासून पाहिले पाहिजेत. या सर्टिफिकेटवर स्टॅम्प आणि स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. याशिवाय, आयआयजी आणि जाआयए सर्टिफिकेट देखील महत्त्वाचे आहेत. कोणतीही दागिने खरेदी करताना बिल आवश्यक घ्या. तुम्ही खरेदी केलेल्या हिऱ्यांची जीआए किंवा सरकारी लॅबमध्ये तपासणी करणे शक्य आहे. दागिने ऑनलाईन खरेदी करताना सर्टिफिकेट आणि किंमती तपासून पाहावेत.