देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी 'प्रधानमंत्री सूर्योदय योजने'ची घोषणा केली. या योजनेतून गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, शिवाय ऊर्जा क्षेत्रातही भारत स्वयंपूर्ण होईल, असेही मोदी म्हणाले. या योजनेंतर्गत सरकारने एक कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
ऊर्जा मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, डिसेंबर २०२३ पर्यंत भारतात सौर ऊर्जा सुमारे ७३. ३१ गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, डिसेंबर २०२३ रूफटॉप सोलर क्षमता सुमारे ११.०८ गिगावॅट आहे. केंद्राकडे सध्या राष्ट्रीय रूफटॉप योजना सौर रूफटॉप प्रकल्पाच्या भांडवली खर्चाच्या एकूण ४० टक्के आर्थिक सहाय्य देते.
केंद्र सरकारने २०१४ मध्ये रूफटॉप सोलर प्रोग्राम सुरू केला, ज्याचे उद्दीष्ट २०२२ पर्यंत ४० हजार मेगावॉट किंवा ४० गिगावॅटची क्षमता साध्य करणे आहे. वॅट हे विजेचे एकक आहे आणि कालांतराने वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण म्हणून मोजले जाते.
संबंधित बातम्या