Natwar Singh: देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास-exexternal affairs minister natwar singh dies at 93 ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Natwar Singh: देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Natwar Singh: देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचं निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Aug 11, 2024 09:17 AM IST

Natwar Singh Passes Away: देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे दिल्लीजवळील गुरुग्रामयेथील मेदांता रुग्णालयात निधन झाले.

देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन
देशाचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन

Natwar Singh Dies at 93: माजी परराष्ट्रमंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९३ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नटवर सिंह यांचे दिल्लीजवळील गुरुग्रामयेथील मेदांता रुग्णालयात निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नटवर सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'नटवर सिंह यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणाच्या जगात त्यांनी भरीव योगदान दिले. ते आपल्या बुद्धीमत्तेसाठी तसेच विपुल लेखनासाठी ही ओळखले जात होते. या दु:खाच्या काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

नटवर सिंह हे काँग्रेसचे माजी नेते होते. देशाच्या प्रतिष्ठेच्या परराष्ट्र सेवेत अनेक दशके घालवल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नटवर सिंह यांचा जन्म १९३१ मध्ये राजस्थानमधील भरतपूर येथे झाला. मुत्सद्देगिरीतील अनुभवाचा खजिना आपल्या राजकीय कारकीर्दीत आणणारे ते करिअर डिप्लोमॅट होते आणि महाराजांच्या जीवनापासून ते परराष्ट्र व्यवहारातील बारकावे या विषयांवरील विपुल लेखक होते.

१९५३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत निवड

नटवर सिंह यांची १९५३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली. १९८४ मध्ये त्यांनी सेवेचा राजीनामा दिला आणि काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी निवडणूक जिंकली आणि १९८९ पर्यंत केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय

२००४ मध्ये नटवर सिंह पुन्हा केंद्रीय मंत्री झाले. मात्र, इराकी तेल घोटाळ्याप्रकरणी त्यांनी १८ महिन्यांनंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर नटवर सिंग यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. १९६६ ते १९७१ या काळात ते पाकिस्तानातील भारताचे राजदूत होते. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या कार्यालयाशी संलग्न होते.

पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

नटवर सिंग यांनी 'द लिगेसी ऑफ नेहरू : अ मेमोरियल ट्रिब्यूट' आणि 'माय चायना डायरी १९५६-८८' यांसह अनेक पुस्तके लिहिली. 'वन लाईफ इज नॉट इनफ' असे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. त्यानंतर नटवरसिंग यांचे काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद झाले. नटवर सिंह यांना १९८४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विभाग