मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ED Raid in Delhi : दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी EDचे देशभरात ४० ठिकाणी छापे; हैदराबादमध्ये २५ ठिकाणी कारवाई

ED Raid in Delhi : दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी EDचे देशभरात ४० ठिकाणी छापे; हैदराबादमध्ये २५ ठिकाणी कारवाई

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 16, 2022 11:49 AM IST

ED Raid in Delhi : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणा विरोधात ईडी गेल्या काही दिवसांपासून तपास करत आहे. आज सकाळपासून ईडीच्या पथकाने दिल्लीत छापेमारी सुरू केली आहे.

ED Raid
ED Raid

दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणा विरोधात ईडी गेल्या काही दिवसांपासून तपास करत आहे. आज सकाळपासून ईडीच्या पथकाने दिल्लीत छापेमारी सुरू केली आहे. दिल्लीत ४० ठिकाणी तर हैदराबाद, बंगलोर, चेन्नई तसेच देशात आदी २५ ठिकाणी सकाळपासून छापेमारी सुरू करण्यात आली आहे.

दिल्ली सरकारच्या मद्य धोरणात मोठा घोटाळा झाला असून या प्रकरणाचा ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यास ईडीच्या पथकाने सुरुवात केली आहे. आज सकाळपासून देशभरात दिल्ली हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नई सोबत देशातील तब्बल ४० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. हैदराबाद शहरात २५ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. आज दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचीही ईडीचे पथक चौकशी करणार आहेत. गुरुवारी देखील सीबीआई कोर्टाच्या जज गीतांजलि गोयल यांनी सत्येंद्र जैन याची चौकशी करण्यासाठी परवानगी दिली होती. सीबीआय कोर्टाने आदेश दिला होता की, जैन यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात यावी. त्यांची चौकशी करण्याआधी आज या मोठ्या प्रमाणात धाडी टाकण्यात आल्या आहेत.

दिल्लीत नवीन उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ आम आदमी पक्षाच्या सरकारने लागू केले. हे धोरण लागू झाल्यानंतर दिल्लीतील मद्यविक्रेते ग्राहकांना सवलतीच्या दरात दारू विकत होते. अनेक ठिकाणी एका बाटलीच्या खरेदीवर दुसरी बाटली मोफत दिली जात होती. तपास एजन्सीने या नवीन उत्पादन शुल्क धोरणात घोटाळा झाल्याचा दावा केला होता, त्यानंतर लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नंतर अरविंद केजरीवाल सरकारने हे धोरण मागे घेतले. या प्रकरणात आम आदमी पक्षाचा आरोप आहे की, भाजप केजरीवाल सरकारला त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केजरीवाल सरकारच्या शिक्षण-आरोग्य मॉडेलमुळे मोदी सरकार त्रस्त असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग