Madhya Pradesh News: प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील एका न्यायालयाने शिवसेनेच्या माजी नेत्यासह सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर मख्य आरोपी असलेल्या शिवसेनेच्या माजी नेत्याने प्रेयसीला सुपारी देऊन तिची हत्या केली.
शिवसेनेच्या उज्जैन जिल्ह्यातील माजी शहराध्यक्षासह सहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरण २०१९ सालचे आहे. प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकल्याने मुख्य आरोपीने प्रेयसीची हत्या केली होती. प्रेयसीने आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीने प्रेयसीला कारने धडक दिली आणि त्याला अपघाताचे रूप दिले. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला पोलिसांनी पुराव्याच्या आधारे सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून न्यायालयात त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता मुख्य आरोपी सुखविंदर खनुजा याने न्यायालयात शरणागती पत्करली. तर उर्वरित आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.
१५ नोव्हेंबर २०१९ रोजी उज्जैनमधील चिंतामण बायपास रोडवर कारच्या धडकेत भगीरथपुरा येथील एका तरुणी गंभीर जखमी झाली. त्यानंतर सुखविंदर सिंग खनुजाने तरुणीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता सगळा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांनी चालक वाहिद आणि सुखविंदर खनुजा यांना अटक केली. उज्जैन कोर्टाने निकाल देताना सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पोलिसांनी तपास सुरू केला असता मृत महिलेने सुखविंदर सिंग खनुजा यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचे तपासात उघड झाले. तसेच या तरुणीने खनुया यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. यामुळे सुखविंदरने मुलीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी साथीदारांसह प्रियकराच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करून हा प्रकार घडवून आणला. सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी वाहिद, सुखविंदर सिंग, समीर उर्फ मोहसीन, पंकज उर्फ पवन, उमापती पंकज आणि संजय उर्फ संजू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
एडीजे वीरेंद्र वर्मा यांनी उज्जैन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी केली. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर दोषींना कलम ३०२, २०१ अन्वये जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारच्या वतीने सहाय्यक जिल्हा अभियोजन अधिकारी नितेश कृष्णन यांनी न्यायालयात बाजू मांडली. जिल्हा अभियोजन अधिकारी कुलदीप सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी सहा जणांना आरोपी केले आहे. साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.