Viral News : एक्स गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचे तब्बल ६००० कोटी फेकले कचऱ्याच्या डब्यात! प्रियकरला खोदायचा आहे कचऱ्याचा डोंगर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : एक्स गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचे तब्बल ६००० कोटी फेकले कचऱ्याच्या डब्यात! प्रियकरला खोदायचा आहे कचऱ्याचा डोंगर

Viral News : एक्स गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचे तब्बल ६००० कोटी फेकले कचऱ्याच्या डब्यात! प्रियकरला खोदायचा आहे कचऱ्याचा डोंगर

Nov 28, 2024 09:11 AM IST

Viral News : एका व्यक्तीच्या एक्स गर्लफ्रेंडने प्रियकराचे ६००० कोटी कचऱ्याच्या डब्यात फेकले आहे. या मुळे तरुण धक्क्यात असून त्याला आता त्याचे हरवलेले पैसे सोधण्यासाठी कचऱ्याचा ढीग खोदायचा आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

एक्स गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचे तब्बल ६००० कोटी पेकले डस्टबिनमध्ये! प्रियकरला खोदायचा आहे कचऱ्याचा डोंगर
एक्स गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचे तब्बल ६००० कोटी पेकले डस्टबिनमध्ये! प्रियकरला खोदायचा आहे कचऱ्याचा डोंगर

Viral News : एका व्यक्तीच्या एक्स गर्लफ्रेंडने तिच्या प्रियकराचे तब्बल  सहा हजार कोटी रुपये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले आहेत. प्रेयसीच्या या कृतीमुळे प्रियकरला वेड लागल्याची वेळ आली आहे. तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे ? होय हे झाले खरे आहे.  तरुणीने तिच्या प्रियकराचा एक  एक हार्ड ड्राइव्ह  चुकून काचऱ्याच्या डब्यात फेकला. या हार्ड ड्राइवमध्ये सुमारे ८०००  बिटकॉईन होते. त्याची किंमत ५६९ दशलक्ष पौंड म्हणजेच ६००० कोटींच्या बरोबरीने आहे. वेल्समध्ये राहणारा जेम्स हाऊल्स असे या तरुणाचे नाव असून त्याला त्याचा हार्ड ड्राइव शोधण्यासाठी आता कचऱ्याचा ढीग खोदायचा आहे.  

हाऊल्सची एक्स गर्लफ्रेंड हाफिना एडी-इव्हान्स म्हणाली की, तिला त्या हार्ड ड्राइव्हमध्ये बिटकॉईन असल्याची माहिती नव्हती. तिने  हार्ड ड्राइव कचऱ्यात फेकले. डेली मेलशी बोलताना एडी-इव्हान्स म्हणाली, "होय, मी त्याचा हार्ड ड्राइव हा कचऱ्यात  फेकला. हे करायसाठी त्यानेच मला भाग पाडलं. त्याने सांगितल्या नुसार संगणकाचे जुने भाग व इतर वस्तू काळ्या पिशवीत टाकून कचऱ्यात फेकून दिल्या. त्यात काय आहे ते मला माहिती नव्हतं. मी ते साफसफाईसाठी केलं.

जेम्स हाऊल्स करणार कायदेशीर कारवाई 

धक्क्यात असलेला तरुण आता शहरातील  कचऱ्याचे ढीग खोदून हार्ड ड्राइव्ह शोधण्याची परवानगी मिळावी यासाठी हाऊल्स यांनी  न्यायालयात खटला दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या मार्गात मोठा अडथळा आहे. कचऱ्याचे ढीग १,१०,००० टन आहेत. हरवलेल्या मालमत्तेपैकी १० टक्के संपत्ती सापडल्यास तो  स्थानिक भागाला दान करू, असेही हाऊल्स याने  सांगितले.

 एडी-इव्हान्स म्हणाली की हॉवेल्सने हार्ड ड्राइव्ह तातडीने शोधावे अशी इच्छा आहे.  जेणेकरून तो त्याबद्दल बोलणे थांबवते. "त्यांन जे सांगितलं ते मी केलं, पण आता मला सारखा तो बोलत असल्याने त्यांचं  ऐकून मला कंटाळा आलाय.

न्यूपोर्ट सिटी कौन्सिलने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, २०१३ पासून कचऱ्याचे ढीग खोदण्यासाठी हाऊल्सनी केलेली विनंती फेटाळण्यात आली आहे. पर्यावरणीय  कारणांमुळे हा कचऱ्याचा डोंगराचे खोदकाम करणे शक्य नसल्याचे परिषदेचे म्हणणे आहे. या ठिकाणी कारवाई करणारी आम्ही एकमेव अधिकृत संस्था आहोत. हाऊल्स यांचा दावा निराधार असून आम्ही त्याला कडाडून विरोध करत आहोत. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळेंन हाऊल्स आपली हरवलेली संपत्ती शोधण्यात यशस्वी होतो  का? हे पाहावे लागेल.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर