माजी सैनिकाची क्रूरता! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह कुटुंबातील ५ जणांची केली हत्या, समोर आले धक्कादायक कारण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  माजी सैनिकाची क्रूरता! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह कुटुंबातील ५ जणांची केली हत्या, समोर आले धक्कादायक कारण

माजी सैनिकाची क्रूरता! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह कुटुंबातील ५ जणांची केली हत्या, समोर आले धक्कादायक कारण

Jul 22, 2024 05:04 PM IST

Nationl Crime News : भारतीय लष्करातील एका निवृत्त सुबेदाराने आपल्याच कुटूंबातील पाच लोकांची हत्या केली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

माजी सैनिकाने ६ महिन्याच्या चिमुकल्यासह कुटूंबातील ५ जणांची केली हत्या
माजी सैनिकाने ६ महिन्याच्या चिमुकल्यासह कुटूंबातील ५ जणांची केली हत्या

माजी सैनिकाने सहा महिन्याच्या चिमुकल्यासह कुटूंबातील सहा जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना हरियाणा राज्यातील अंबाला येथे घडली आहे. भारतीय लष्करातील एका निवृत्त सुबेदाराने आपल्याच कुटूंबातील पाच लोकांची हत्या केली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.  मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी रात्रीची आहे. 

मृतांमध्ये आई सरोपी देवी (वय, ६५) भाऊ भाई हरीश कुमार (३५), हरीश यांची पत्नी सोनिया (३२  वर्ष), मुलगी यशिका (५ वर्षे) आणि सहा महिन्याचा मुलगा मयंक यांचा समावेश आहे. 
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचे नाव भूषण कुमार आहे. त्याने रात्रीच्या वेळी सर्वात आधी आपल्या भावावर हल्ला केला. त्यानंतर एक-एक करून संपूर्ण कुटूंबाला संपवलं. त्याने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. भूषणने आपले वडील व भाऊ हरीश यांच्या मोठ्या मुलीवरही हल्ला केला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी सांगितले की, दोन भावांमध्ये असलेल्या जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. नारायणगड येथील रातौर येथे त्यांची जमीन होती. त्यावर दोन्ही भावांनी दावा केला होता. पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. आरोपी भूषण कुमार सध्या फरार झाला असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी म्हटले आहे.

रील बनवण्याच्या नादात घेतला अल्पवयीन मुलाने घेतला गळफास!

मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका ११ वर्षाच्या मुलाचा रील बनवण्याच्या नादात मृत्यू झाला यह . सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रील तयार करण्यासाठी एका मुलाने गळ्यात दोरीचा फास घातला. मात्र, हा फास गळ्याभोवती आवळल्याने त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी हा गळ्यात फास लावून रील बनवत होता. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अंबा येथे घडली. करण परमार (वय ११) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. घटनेनंतर मुले पळून गेली. ज्या मुलाने व्हिडिओ बनवला तोही त्याचा मोबाईल तिथेच टाकून पळून गेला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर