मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Priyanka Chopra In UN: 'जगात सारं काही आलबेल नाही', संयुक्त राष्ट्रात प्रियांका चोप्राचे भाषण

Priyanka Chopra In UN: 'जगात सारं काही आलबेल नाही', संयुक्त राष्ट्रात प्रियांका चोप्राचे भाषण

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 20, 2022 04:27 PM IST

Priyanka Chopra In UN: संयुक्त राष्ट्राची सदिच्छा दूत असणाऱ्या प्रियांका चोप्राने जगासमोर असलेल्या सध्याच्या समस्यांबाबत भाष्य केलं. तसंच एसडीजी मोमेंटने निश्चित केलेलं ध्येय गाठण्यासाठी अर्धाच वेळ उरला असल्याचं तिने म्हटलं.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra In UN: बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण करताना जगात सगळं काही ठीक नसल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्रामवरून प्रियांका चोप्राने तिच्या भाषणाचा व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत मलाला युसुफजाई, अमांडा गोर्मन, सोमाया फारूकी, जुडिथ हिल यासुद्धा दिसतात. भाषणातून प्रियांका चोप्राने जगासमोर असलेल्या अनेक समस्या अन् प्रश्न उपस्थित केले. प्रियांका चोप्रा ही संयुक्त राष्ट्रांची सदिच्छा दूत आहे.

प्रियांका चोप्राने संयुक्त राष्ट्रात भाषण करताना जगभरातील गरीबी, भूकबळी, स्थलांतर, असमानता, वाढता संघर्ष, वातावरण बदल, जागतिक महामारी इत्यादींमुळे लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत असल्याचं म्हटलं. यामुळे जगाचा पाया पुन्हा कमकुवत होत आहे, आपण यासाठी बऱ्याच काळापासून संघर्ष केला असल्याचंही ती म्हणाली.

आपल्या जगात सगळं काही ठीक नाहीय. संकट अचानक येत नाहीत पण त्यांना एका योजनेद्वारे नक्कीच ठीक करता येऊ शकतं. आपल्याकडे ती योजना आहे. संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास ध्येय जे जगाला गाठायचं आहे. हे ध्येय २०१५ मध्ये जगभरातील लोकांनी मिळून तयार केलं होतं. आपण ज्या जगात राहतो त्याला बदलण्याची एक मोठी संधी आपल्याकडे असल्याचं प्रियांका चोप्राने भाषणात म्हटलं.

प्रियांका चोप्राने म्हटलं की, जगाचं वर्तमान आणि भविष्य तुमच्या हातात आहे. आपल्याला आपल्या लोकांसाठी हे करावं लागेल. आपल्या पृथ्वीसाठी हे करायला हवं. आपण स्वच्छ आणि सुरक्षित जगात राहण्याचे अधिकारी आहे पण वेळ निघून चाललीय. २०३० साठी ठरवण्यात आलेलं ध्येय गाठण्यासाठीचा अर्धा वेळ निघून गेला आहे.

संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार एसडीजी मोमेंट ही गरीबी संपवण्यासाठी आणि पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी तसंच जीवनमान उंचावण्याच्या दिशेने वाटचाल करणारं एक पाऊल आहे. याच्या १७ ध्येयांना २०१५ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्यांनी शाश्वत विकासासाठी २०३० चा अजेंडा म्हणून स्वीकारलं होतं. याअंतर्गत ध्येय गाठण्यासाठी १५ वर्षांची योजना तयार करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या