मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू, सरसंघचालक मोहन भागवत

भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू, सरसंघचालक मोहन भागवत

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Nov 16, 2022 09:16 AM IST

भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू असून आम्ही हे १९२५ पासून म्हणत आहे असेही सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं.

भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू, सरसंघचालक मोहन भागवत
भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू, सरसंघचालक मोहन भागवत (PTI)

भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. छत्तीसगढ जिल्ह्यात अंबिकापूरमध्ये आयोजित स्वयंसेवकांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोहन भागवत म्हणाले की, कोणालाही पूजा करण्याची पद्धत बदलायची गरज नाहीय. कारण सर्व प्रार्थना या एकाच ठिकाणी जातात.

विविधतेत एकता हे प्राचीन काळापासून भारताचं वैशिष्ट्य आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हा हिंदुत्वाचा विचार आहे. भारतात राहणारा प्रत्येकजण हिंदू असून आम्ही हे १९२५ पासून म्हणत आहे. जे भारताला आपली आई, मातृभूमी मानतात आणि भारतातील विविधतेत एकतेची संस्कृती जगायला तयार आहेत ते हिंदू आहेत. मग त्या व्यक्तीची भाषा, आहार, प्रथा-परंपरा कोणतीही असो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं.

भारतातील प्रत्येकाचा डीएनए आणि पूर्वज एकच आहेत. भारतात विविधता असूनही आपण सगळे एकसमान आहे. प्रत्येक भारतीय हा ४० हजार वर्षे जुन्या अखंड भारताचा भाग आहे. प्रत्येकाने आपली श्रद्धा आणि पूजा करायची पद्धत जोपासायला हवी. तसंच दुसऱ्यांच्या आयुष्यातील गोष्टी बदलायचा प्रयत्न करू नये अशी आपल्या पूर्वजांची शिकवण असल्याचंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point

विभाग