मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress vs BJP : ‘राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत कुत्रंही...’, भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त

Congress vs BJP : ‘राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत कुत्रंही...’, भाजपच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 16, 2023 04:35 PM IST

Bharat Jodo Yatra : हरयाणातून प्रवास करत काँग्रेसची भारत जोडो यात्रा पंजाबमध्ये दाखल झाली आहे. परंतु पदयात्रा सुरू असतानाच भाजपच्या नेत्यानं राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Congress vs BJP On Bharat Jodo Yatra
Congress vs BJP On Bharat Jodo Yatra (Congress Twitter)

Congress vs BJP On Bharat Jodo Yatra : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा अनेक राज्यांचा प्रवास करत पंजाबमध्ये पोहचली आहे. दक्षिणेसह मध्य भारतातील राज्यांचा प्रवास करून उत्तर भारतातील राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेनं प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळं भारत जोडो यात्रा बंद करण्याची मागणी केल्यानंतर आता हरयाणाच्या गृहमंत्र्यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पदयात्रेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.

भाजपचे जेष्ठ नेते आणि हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज हे एएनआयशी बोलताना म्हणाले की, यापूर्वी राजकीय पक्षांच्या यात्रा निघायच्या त्यावेळी मोठ्या संख्येनं लोक गर्दी करायचे. जयप्रकाश नारायण यांच्या यात्रेलाही अनेक लोकांनी गर्दी करत त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत कुत्रंही भुंकलं नाही. हरयाणात काँग्रेसचे अनेक नेते रोज काही ना काही स्टंटबाजी करत आहेत. परंतु त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नसल्यामुळंच त्यांच्या पदयात्रेत लोकांनी गर्दी न केल्याचं वक्तव्य अनिल वीज यांनी केलं आहे. त्यामुळं आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.

भाजप नेते अनिल वीज हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वी लव्ह जिहादच्या मुद्द्यांवरून तर्कहीन विधानं केलेली आहे. याशिवाय रोखठोक आणि बिनधास्त वक्तव्यांमुळं त्यांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागलेला आहे. परंतु आता त्यांनी भारत जोडो यात्रेत कुत्रंही भुंकलेलं नाही, असं वक्तव्य केल्यामुळं त्यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणातून प्रवास करत पंजाबमध्ये पोहचली आहे. पुढील काही दिवसांत पदयात्रा हरयाणामध्ये प्रवेश करणार असून त्यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात देशातील अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL_Entry_Point