ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगम वरिष्ठ निवासी पदांसाठी मेगा भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड; वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगम वरिष्ठ निवासी पदांसाठी मेगा भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड; वाचा

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगम वरिष्ठ निवासी पदांसाठी मेगा भरती, मुलाखतीद्वारे होणार निवड; वाचा

Feb 27, 2024 12:40 PM IST

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने वरिष्ठ निवासी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या साठी मुलाखती घेतल्या जाणार असून त्याद्वारे निवड केली जाणार आहे.

ESIC Recruitment 2024
ESIC Recruitment 2024 (HT)

ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये वरिष्ठ निवासी पदांसाठी भरती केली जाणार आहे. या साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ESIC या रिक्त पदांद्वारे तीन वर्षांच्या योजनेअंतर्गत वरिष्ठ निवासी GDMO आणि वरिष्ठ पदांसाठी भरती करणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.esic.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरती प्रक्रिये संदर्भात माहिती घेऊ शकतात.

शिवरायांचं नाव घेता आणि लोकांची आई-बहीण काढता?; फडणवीसांनी जरांगेंना सुनावले

ईएसआयसीने दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया राबवण्यात येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. ही मुलाखत ६ मार्च रोजी सकाळी ९.१५ ते ११ या वेळेत ESIC हॉस्पिटल पेनिया, बेंगळुरू येथे होणार आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ११ पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय ४५ वर्षे असावे. निवडलेल्या उमेदवारांना निवड आदेश मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत ताबडतोब पदावर रुजू व्हावे लागणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर अटी व शर्तींसह अधिसूचना काळजीपूर्वक वाचून त्यांतर नंतर अर्ज करावा तसेच मुलाखतीला येतांना आवश्यक कागदपत्रे घेऊन यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही, असे देखील सांगण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश

मुलाखतीसाठी ही कागदपत्रे आवश्यक

उमेदवारांनी मुलाखतीसाठी १० वी गुणपत्रिका प्रमाणपत्र, (वयाचा पुरावा म्हणून), एमबीबीएस, पीजी पदवी प्रमाणपत्र (लागू असल्यास), SC/ST/OBC प्रमाणपत्र, KMC नोंदणी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराच्या दोन फोटो सोबत आणावे. ही सर्व कागदपत्रे स्व-प्रमाणित असावीत या रिक्त पदाशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार पोर्टलवर तपशीलवार सूचना पाहू शकतात.

जीडीएमओ पदासाठी एमबीबीएस असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांना संबंधित विभागात दोन वर्षांचा कामाचा अनुभव असावा तीन वर्षांच्या वरिष्ठ पदभरतीसाठी देखील हाच निकष लागू आहे. या पदांसाठी लागू असलेल्या अटी व शर्तींमध्ये विविध मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. निवडलेल्या उमेदवारांनी या अटी आणि शर्तींचे पालन करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, पूर्वसूचनेशिवाय रिक्त पदांची संख्या बदलली जाऊ शकते आणि मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

निवडलेल्या उमेदवारांना हॉस्पिटलमधील सेवेच्या नियमितीकरणासाठी दावा करता येणार नाही. तसेच वसतिगृहात निवास/क्वार्टर/गणवेश प्रदान केला जाणार नाही. सेवा काळात खाजगी प्रॅक्टिस करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. तर आधीच सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे आवश्यक आहे.

शिवाय, आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पात्रता आणि आवश्यक प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. ज्यांनी तीन वर्षांच्या सेंट्रल सीनियर रेसिडेन्सी योजनेअंतर्गत तीन वर्षांसाठी ज्येष्ठ निवासी म्हणून काम केले आहे ते अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत. याव्यतिरिक्त, जीडीएमओच्या विरुद्ध वरिष्ठ रहिवाशांसाठी पॉथ पोझिशनलसाठी सिक्युरिटी डिपॉझिट आवश्यक आहे, सिक्युरिटी डिपॉझिट ३०००० तर तीन वर्षांच्या योजनेअंतर्गत ज्येष्ठ निवासी पदासाठी ९५.००० अमानत रक्कम भरावी लागणार आहे.

उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अटी व शर्ती पूर्णपणे वाचून अर्ज करावा. निवड मंडळाचा निर्णय अंतिम राहणार असून त्यात कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही.

असा करा अर्ज

ESIC वरिष्ठ निवासी पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी www.esic.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 'करिअर' किंवा 'रिक्रूटमेंट विभागात जाऊन वॉक-इन मुलाखतीसाठी अर्ज करावा. या ठिकाणी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून अचूक तपशीलांसह अर्ज भरा आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर