मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

EPFO ने क्लेम सेटलमेंट प्रक्रिया केली अधिक सुलभ! नॉमिनीला आधार तपशीलाशिवायही मिळणार PF रक्कम

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 20, 2024 08:56 AM IST

epfo big change in the claim settlement rules : ईपीएफ सदस्यांच्या मृत्यूच्या बाबतीत, प्रादेशिक अधिकाऱ्यांना त्यांचे आधार तपशील लिंक करण्यात आणि पडताळण्यात अनेक अडचणी येत होत्या. यामुळे नॉमिनीला पैसे देण्यास विलंब होत होता.

ईपीएफ सदस्यांच्या मृत्यूच्या बाबतीत, प्रादेशिक अधिकाऱ्यांना त्यांचे आधार तपशील लिंक करण्यात आणि पडताळण्यात अनेक अडचणी येत होत्या. यामुळे नॉमिनीला पैसे देण्यास विलंब होत होता.
ईपीएफ सदस्यांच्या मृत्यूच्या बाबतीत, प्रादेशिक अधिकाऱ्यांना त्यांचे आधार तपशील लिंक करण्यात आणि पडताळण्यात अनेक अडचणी येत होत्या. यामुळे नॉमिनीला पैसे देण्यास विलंब होत होता.

epfo big change in the claim settlement rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) दावा निकाली काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. ज्या प्रकरणांमध्ये EPFO ​​सदस्याचे निधन झाले आहे आणि त्यांचे आधार पीएफ खात्याशी लिंक नसल्यास किंवा माहिती जुळत नसणाऱ्या प्रकरणात नॉमिनीला संस्थेने दिलासा दिला आहे. आता सदस्याचे आधार तपशील नसतानाही संबंधित व्यक्तीच्या नॉमिनीला त्यांच्या पीएफ खात्यातून रक्कम मिळवता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Loksabha Election : ठाण्यातील नौपाडा येथे ईव्हीएम बंद! पावणे आठपर्यंत मतदान ठप्प; अनेक मतदार मतदान न करताच परतले माघारी

ईपीएफओने यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, ईपीएफ सदस्यांच्या मृत्यूच्या बाबतीत, प्रादेशिक अधिकाऱ्यांना त्यांचे आधार तपशील जोडण्यात आणि पडताळण्यात विविध अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत, ईपीएफ सदस्याच्या नॉमिनीला पैसे देण्यास विलंब होत होता.

प्रादेशिक अधिकारी देतील मान्यता

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, सदस्याच्या मृत्यूनंतर आधार तपशील दुरुस्त करता येत नसल्यामुळे, आता सर्व मृत्यू प्रकरणांमध्ये आधार लिंक न करता दाव्याची पडताळणी भौतिक आधारावर मंजूर करण्यात येणार आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच ही प्रक्रिया करता येणार आहे. एवढेच नव्हे तर अशा प्रकरणांमध्ये फसवणूक टाळण्यासाठी मृत व्यक्ती आणि दावेदारांच्या सदस्यत्वाचीही चौकशी करण्यात येणार आहे.

Mumbai Weather Update:मुंबईत उष्णतेची लाट! मतदारांनो सकाळच्या सत्रात उरका मतदान! आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट

येथे नियम लागू होतील

हे नियम ज्या प्रकरणांमध्ये EPF UAN मध्ये सदस्याचे तपशील बरोबर आहेत, परंतु आधार डेटामध्ये चुकीची माहिती आहे अशा प्रकरणांमध्ये लागू होतील. त्याच वेळी, जर आधारमध्ये तपशील बरोबर असेल परंतु UAN मध्ये चुकीचा असेल, तर नॉमिनीला यासाठी एक वेगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Maharashtra Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी पावसाचा तर मुंबई, ठाण्यात उष्णतेचा यलो अलर्ट!

नॉमिनीला आधार जमा करण्याची परवानगी

जर एखाद्या सदस्याचा आधार तपशील प्रविष्ट केल्याशिवाय मृत्यू झाला तर, नामनिर्देशित व्यक्तीचा आधार तपशील सिस्टममध्ये जतन केला जाईल आणि त्याला स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली जाईल. तर, ज्या प्रकरणांमध्ये मृत सदस्याने नॉमिनी केलेला नसेल अशा प्रकरणांमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याला आणि कायदेशीर वारसांना त्यांचे आधार जमा करण्याची परवानगी दिली जाईल.

या ठिकाणी होत्या समस्या

१. आधारमध्ये चुकीचे तपशील किंवा आधारमधील तांत्रिक समस्या

२. आधार क्रमांक निष्क्रिय करणे

३. UAN मध्ये प्रविष्ट केलेल्या तपशीलांशी आधार न जुळने.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग