मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Modi Oath Swearing-In Ceremony : मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ घेणार शपथ, JDU-TDP सोबत वाटाघाटी सुरू

Modi Oath Swearing-In Ceremony : मोदींसोबत संपूर्ण मंत्रिमंडळ घेणार शपथ, JDU-TDP सोबत वाटाघाटी सुरू

Jun 07, 2024 07:49 AM IST

Modi Oath Swearing-In Ceremony 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ तारखेला तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मोदी यांच्या सोबत संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ तारखेला तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मोदी यांच्या सोबत संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ तारखेला तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मोदी यांच्या सोबत संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेण्याची शक्यता आहे.

Modi Oath Swearing-In Ceremony 2024 : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजप स्वबळावर २७२ चा आकडा गाठू शकला नाही, त्यामुळे मित्रपक्षांवर भाजपचे अवलंबित्व वाढले आहे. एनडीएचे संख्याबळ २९३ आहे, पण भाजपकडे केवळ २४० खासदार आहेत. त्यामुळे भाजप मित्र पक्षाच्या जोरावर सत्ता स्थापन करणार आहे. मोदी यांचा शपथविधी हा शनिवारी (दि ८) होणार आहे. या शपथविधीपूर्वी मंत्रिमंडळाचे स्वरूप ठरण्यासाठी मोठ्या वाटाघाटी सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Gold smuggling : काय सांगता! चक्क विमानाच्या सीट खाली दुबईहून पुण्याला आणले १ किलो सोने! मुद्देमालासह एकाला अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे. शनिवारी संध्याकाळी दक्षिण आशियाई देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. सरकारमधील मित्रपक्षांच्या वाट्याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. मात्र, आज दुपारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर यावर चर्चा होणार आहे.

Maharashtra Weather Update: मॉन्सून लवकरच राज्य व्यापणार! पुढील काही दिवस कोसळधारा; हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट

सरकार स्थापनेच्या तयारीदरम्यान, मित्र पक्ष महत्त्वाच्या खात्यांवर दावा करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर भाजपच्या जवळच्या सूत्रांनी तसेच टीडीपी आणि जेडीयू या दोन सर्वात महत्त्वाच्या मित्रपक्षांनी सांगितले की मंत्रिमंडळातील विभाग आणि मंत्र्यांची संख्या याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भारताचे निमंत्रण स्वीकारले आहे. मुइज्जू व्यतिरिक्त दक्षिण आशियातील अनेक नेतेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांचा समावेश आहे.

वडिलांच्या ‘त्या’ अटीमुळे टीव्ही क्वीन एकता कपूर अजून आहे अविवाहित! काय होती ती अट? वाचा...

चीनच्या जवळचे मानले जाणारे मुइझ्झू यांच्या नेतृत्वाखाली मालदीवशी द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. मात्र, तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या परदेशी नेत्यांपैकी ते एक होते.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे आणि वरिष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी यांच्यासह आरएसएसच्या नेत्यांशी चर्चा केली आहे.

टीडीपी सभापतीपदासाठी आग्रही असल्याची बातमी आहे. मात्र, त्यांनी अशी कोणतीही अट घातली नाही असे टीडीपीच्या नेत्याने सांगितले. दिवंगत जीएमसी बालयोगी यांना १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सभापती बनवले होते. मात्र, तेव्हा देखील आम्ही कोणत्याही कोणत्याही मंत्रिपदाची मागणी केलेली नव्हती.

टी-२० वर्ल्डकप २०२४