मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka News : सट्टेबाजीचा नाद नडला! क्रिकेट बेटीगमध्ये इंजिनिअर हरला दीड कोटी; पत्नीनं केली आत्महत्या

Karnataka News : सट्टेबाजीचा नाद नडला! क्रिकेट बेटीगमध्ये इंजिनिअर हरला दीड कोटी; पत्नीनं केली आत्महत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 26, 2024 07:17 AM IST

Karnataka News : पोलिसांनी (Karnataka Crime) दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये २४ वर्षीय रंजिता व्ही हिने आरोप केला आहे की, ज्या लोकांकडून तिच्या पतीने कर्ज घेतले होते ते लोक अनेकदा त्यांच्या घरी येऊन त्रास देत असत.

ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीजा नाद एका अभियंत्याला चांगलाच महागात पाडला आहे.
ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीजा नाद एका अभियंत्याला चांगलाच महागात पाडला आहे.

Karnataka crime news : ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीजा नाद एका अभियंत्याला चांगलाच महागात पाडला आहे. तब्बल दीड कोटी रुपये या अभियंत्याने गमावले असून त्याच्या या सट्टेबाजीच्या नादापोटी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीने ज्या लोकांकडून पैसे उसने घेतले होते. ते घरी येऊन त्रास देत असल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले आहे. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी १३ जणांविरुद्ध कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. १३ पैकी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे.

Suicide Prevention: थांबा, आत्महत्येचा विचार करत असाल तर या गोष्टी आधी करा!

ही घटना कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसादुर्गाचे आहे, जेथे लघु पाटबंधारे विभागात कार्यरत असलेल्या दर्शन बाळू नावाच्या सहाय्यक अभियंत्याने पटकन श्रीमंत होण्याच्या नादात क्रिकेट सट्टेबाजीत सुमारे दीड कोटी रुपये गमावले. हे पैसे परत करू शकला नाही. यासाठी त्याने सावकारांकडून कर्ज काढले. पैसे वसूल करण्यासाठी अनेक जण त्याच्या घरी तगादा लावू लागले. त्याच्या पत्नीला देखील पैसे वसूल करण्यासाठी त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून दर्शनची पत्नी रंजिता वी हिने आत्महत्या केली.

Holi 2024 : देशभरात धूळवड जल्लोषात! विविध रंगाची उधळण करत सण साजरा; पाहा फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय रंजिताने सुसाईड नोटमध्ये आरोप केला आहे की, तिच्या पतीने ज्या लोकांकडून कर्ज घेतले होते ते लोक अनेकदा त्यांच्या घरी येऊन त्रास देत असत. याला कंटाळून ती आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे न दिल्यास संपूर्ण कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी सावकारांनी दिली होती. यामुळे घाबरलेल्या रंजिताने १९ मार्च रोजी आत्महत्या केली. मृत रंजिताच्या वडिलांनी आता १३ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्याकडून त्यांचा जावई दर्शनने कर्ज घेतले होते. तक्रारीच्या आधारे, १३ संशयितांविरुद्ध आयपीसी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ आरोपींपैकी शिवु, गिरीश आणि व्यंकटेश या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपी अजूनही फरार आहेत. दर्शन आणि रंजिता यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने दीड कोटी रुपयांच्या कर्जापैकी बहुतांश कर्जदारांना परत केले होते. आता फक्त ५४ लाख रुपये बाकी होते. मात्र, दर्शनाच्या सासरच्यांनी आपल्या तक्रारीत त्याला निर्दोष ठरवले आहे. फिर्यादीनुसार, दर्शनला सट्टेबाजीमध्ये स्वारस्य नसून लोन शार्कने त्याला जाणीवपूर्वक आमिष दाखवून या जाळ्यात ढकलले.

IPL_Entry_Point