उत्तरप्रदेशमधील इटावा शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. १२ जानेवारी रोजी एका इंजिनिअर तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. तपास केला असता हा खून त्याच्या पत्नीने व प्रेयसीने दोघींनी मिळून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पत्नीला अटक केली. तर प्रेयसी घटनेपासून फरार आहे. तिचा शोध केला जात आहे. असा आरोप आहे की, मृत पत्नीसमोरच प्रेयसीसोबत लैंगिक संबंध स्थापित करत होता.
इटावा जिल्ह्यातील सिव्हिल लाइन्स भागात ही घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक संजय कुमार यांनी सोमवारी सांगितले की, मृताचे नाव राघवेंद्र (वय ४५) असे आहे. राघवेंद्रची ११ जानेवारी रोजी त्याची पत्नी आणि प्रेयसीने हत्या केली होती. त्यानंतर अनेक किस्से रचले गेले पण पोलीस तपासात सर्व काही उघडकीस आले. नवी दिल्लीतील जिंदाल शॉप कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या राघवेंद्र यादव यांची डोक्यात लोखंडी मुसळ मारून त्यांची हत्या केली होती. यानंतर मृतदेह रजाईत गुंडाळून जाळण्यात आला.
घरातून धूर निघल्यानंतर शेजारच्या महिलेने डायल ११२ ला माहिती दिली. ज्याच्या आधारे फॉरेन्सिक पथकासह पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राघवेंद्र यादव यांची पत्नी किरण यादव आणि राघवेंद्रची प्रेयसी वर्षा यांनी मिळून हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासठी मृतदेह पेटवून दिल्याचे तपासात समोर आले. पोलिस अधिकारी तपासासाठी घटनास्थळी पोहोचले असता राघवेंद्रच्या पत्नीने स्वत:ला एका खोलीत बंद करून पतीची हत्या करून कोणीकरी पळून गेले अशी कहाणी रचली.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एसएसपींनी पोलिसांची चार पथके तयार केली होती. राघवेंद्र यांचा मुलगा प्रिन्स यादव याने १२ जानेवारी रोजी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटले होते की, आपल्या आईने वडिलांची हत्या केली आहे. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी मोतीझील चौकाजवळ राघवेंद्रची पत्नी किरण यादव हिने हत्येसाठी वापरलेले लोखंडी पेस्टल (मूसळ) जप्त केले आहे. पोलिसांनी सांगितले की, राघवेंद्रचे चारित्र्य चांगले नव्हते. तो पत्नीसमोरच प्रेयसीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत होता. तसेच प्रेयसीलाही ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर त्याची पत्नी आणि प्रेयसीने मिळून त्याला संपवण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या