मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  indigo flight : टेकऑफ करताच इंडिगो विमानाचे इंजिन झाले फेल, थोडक्यात बचावले १२२ प्रवासी
indigo flight
indigo flight

indigo flight : टेकऑफ करताच इंडिगो विमानाचे इंजिन झाले फेल, थोडक्यात बचावले १२२ प्रवासी

07 February 2023, 0:38 ISTShrikant Ashok Londhe

Engine indigo flight shut down takeoff : अमृतसरहून कोलकात्याकडे १२२ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानाचे इंजिन ४ मिनिटातच बंद झाले. त्यानंतर विमान पुन्हा अमृतसर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

अमृतसरच्या श्री गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री मोठा अपघात टळला. अमृतसर-कोलकाता इंडिगो विमानाच्या उड्डाणानंतर चार मिनिटांत इंजिनमध्ये बिघाड झाला. अशा स्थितीत विमान परत विमानतळावर उतरवण्यात आले. विमानात १२२ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. 

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १०.२४ वाजता इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट ५ हजार  फूट उंचीवर पोहोचले तेव्हा चालक दलाला इंजिन बंद झाल्याची माहिती मिळाली. याबाबत तातडीने विमानतळ आणि आपत्कालीन सेवांना माहिती देण्यात आली. क्रूने उड्डाण पुन्हा विमानतळाकडे वळवले आणि १६ मिनिटांनंतर ते पुन्हा विमानतळावर उतरले गेल. लँडिंग केल्यानंतर विमानाला टो करून ऍप्रनला नेण्यात आले. 

पर्यायी विमानाने प्रवाशांना पाठवले -
विमानतळ संचालक रितू शर्मा यांनी सांगितले की, कोलकात्याच्या विमानात १२२ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. यानंतर इंडिगो एअरलाइन्सने पर्यायी विमानाची व्यवस्था करून प्रवाशांना कोलकाता येथे पाठवले. ३ प्रवाशांनी पुढील फ्लाइटमध्ये चढण्यास नकार दिला. विमानतळावर आपत्कालीन सेवा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

त्याच वेळी, सरकारने सोमवारी संसदेत सांगितले की नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) फ्लाइट दरम्यान अल्कोहोल सेवा मर्यादित करण्याशी संबंधित कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही.  नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. त्यांना विचारण्यात आले की DGCA मद्यपानाच्या प्रभावाखाली प्रवाशांकडून गैरवर्तन करण्याच्या घटनांमुळे फ्लाइटमध्ये अल्कोहोल देण्यावर निर्बंध घालण्याचा विचार करत आहे का. याला उत्तर देताना सिंग म्हणाले, 'नागरी विमान वाहतूक संचालनालयात असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

विभाग