ED करणार ६ हजार कोटींच्या जप्त मालमत्तेचा लिलाव! फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ED करणार ६ हजार कोटींच्या जप्त मालमत्तेचा लिलाव! फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार

ED करणार ६ हजार कोटींच्या जप्त मालमत्तेचा लिलाव! फसवणूक झालेल्या ३२ लाख गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार

Dec 09, 2024 09:39 AM IST

ED to sell assets of 6000 crore rupees ponzi scam : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करून फसवणुकीतील पीडितांना रक्कम परत दिली जणार आहे.

ED करणार ६ हजार कोटींच्या मालमत्तेचा लिलाव! तब्बल ३२ लाख घोटाळाग्रस्तांच्या खात्यात जमा करणार रक्कम
ED करणार ६ हजार कोटींच्या मालमत्तेचा लिलाव! तब्बल ३२ लाख घोटाळाग्रस्तांच्या खात्यात जमा करणार रक्कम (HT_PRINT)

ED to sell assets of 6000 crore rupees ponzi scam : पॉन्झी घोटाळ्यात बळी पडलेल्या लाखो गुंतवणूकदारांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांचे गेलेले पैसे परत करण्याची तयारी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने केली आहे.  या साठी ईडीने जप्त केलेल्या तब्बल सहा हजार कोटीरुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता विकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानेही गरीब गुंतवणूकदारांना या माध्यमातून त्यांची गेलेली रक्कम परत देण्यात यावी अशी भूमिका घेतली होती.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक घोटाळ्यांना बळी पडलेल्या नागरिकांना त्यांची गेलेली रक्कम परत देण्याचे आश्वास दिले होते. फसवणुकीला बळी पडलेल्या पीडितांना ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव  करून पैसे वसूल करण्यासाठी कायद्यात बदल करण्याचे देखील ते म्हणाले होते. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अ‍ॅग्री गोल्ड पॉन्झी घोटाळ्यातील ३२  लाख पीडितांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी ६,०००  कोटी रुपयांहून अधिक जप्त करण्यात आलेली मालमत्ता विकली जाणार आहे. गेल्या आठवड्यात ईडीने अ‍ॅग्री गोल्ड कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरोधात हैदराबादच्या पीएमएलए कोर्टात धाव घेतली होती. ईडीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि ओडिशामधील जप्त मालमत्तांची विक्री करण्याची मागणी केली होती.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ईडीने ज्या मालमत्तांसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामध्ये २,३१० निवासी व व्यावसायिक भूखंड, अपार्टमेंट्स, मनोरंजन पार्कयांचा समावेश आहे. जप्त केलेल्या २,३१०  मालमत्तांपैकी आंध्र प्रदेशात २२५४, तेलंगणामध्ये ४३, कर्नाटकमध्ये ११ आणि ओडिशामध्ये २ मालमत्ता आहेत. यापूर्वी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सीआयडीने एपीपीडीएफ कायद्यांतर्गत जप्त केलेली मालमत्ता पीडितांना परत करण्यास परवानगी दिली होती.

काय आहे प्रकरण ? 

अ‍ॅग्री गोल्ड स्कीमच्या एजंटांनी ३२ लाख ग्राहकांकडून ६,४०० कोटींहून अधिक रक्कम गोळा केली होती. आंध्र प्रदेश सीआयडीने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेत ईडीने जप्त केलेल्या मालमत्ता सोडण्याची मागणी केली होती, जेणेकरून पीडितांमध्ये पैसे वितरित केले जाऊ शकतील. ईडीने डिसेंबर २०२० मध्ये अ‍ॅग्री गोल्ड ग्रुप आणि व मालक अवा वेंकट रामा राव, त्यांचे कुटुंबीय अवा वेंकट सेशू नारायण आणि अवा हेमा सुंदरा वरा प्रसाद यांना या प्रकरणी अटक केली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर