ed action on cm hemant soren : जमीन घोटाळा प्रकरणात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने फास आवळला आहे. ईडीच्या पथकाने सोमवारी रात्री सोरेन यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानावर छापेमारी केली. त्यावेळी हेमंत सोरेन घरात नव्हते. मात्र हेमंत सोरेन यांची आलीशान कार आणि महत्वाची कागदपत्रं ईडीने जप्त केली आहेत. दरम्यान, त्यांना ईडीने फरार घोषित केले आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे. या पूर्वी २० जानेवारीच्या दिवशी जेव्हा हेमंत सोरेन यांची ईडीने चौकशी केली होती.
दिल्लीतील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानावर सोमवारी रात्री ईडीच्या पथकाने कारवाई केली. ईडीच्या या कारवाईचा सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) ने निषेध केला आहे. झामुमोचे सरचिटणीस सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन वैयक्तिक कामानिमित्त दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. पक्षाचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत. राजकीय कटाचा एक भाग म्हणून ईडीने हेमंत सोरेन यांच्यावर ही कारवाई केली आहे. हे सर्व त्वरित थांबले गेले पाहिजे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन शनिवारी संध्याकाळी दिल्लीला गेले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे रविवारी सकाळी दिल्लीत आल्यानंतर झारखंडमध्ये राजकीय हालचाली वाढल्या. दरम्यान, ईडीच्या पथकाने सोमवारी दिल्ली येथील सोरेन यांच्या घरावर छापा टाकत त्यांची कार आणि काही कागदपत्रे जप्त केली. दिल्ली आणि रांची येथे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, जेएमएमच्या कार्यकर्त्यांनी राजभवनाजवळ ईडीच्या विरोधात निदर्शने केली. राजभवन, सीएम हाऊस, भाजप कार्यालय, ईडी कार्यालयासह रांचीमधील संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आले.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीला ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. रेकॉर्डनुसार जमिन घोटाळ्या प्रकरणी सोरेन यांची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी तयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पूर्वी २० जानेवारीला हेमंत सोरेन यांची ईडीने तब्बल ७ तास चौकशी केली होती. ८.४६ एकर जमिनीशी जमिन घोटाळ्याचे हे प्रकरण आहे. ईडीने हेमंत सोरेन यांची काही तास चौकशी देखील केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत दिल्लीतल्या निवासस्थानी करण्यात आलेल्या छापेमारीत त्यांची बीएमडब्ल्यू कार आणि काही कागदपत्रं जप्त केली आहे.