मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन श्रीनिवासन ED च्या रडारवर, अनेक कंपन्यावर छापेमारी

चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन श्रीनिवासन ED च्या रडारवर, अनेक कंपन्यावर छापेमारी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 01, 2024 03:43 PM IST

ED Raid on N. Srinivasan Company : ईडीने एन श्रीनिवासन यांच्या अनेक कंपन्यावर छापेमारी केली. ईडीने एन श्रीनिवासन यांच्या चेन्नई येथील इंडिया सिंमेंट कंपनी परिसरात छापेमारी केली.

N. Srinivasan
N. Srinivasan

भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गुरुवारी ईडीने एन श्रीनिवासन यांच्या अनेक कंपन्यावर छापेमारी केली. ईडीने एन श्रीनिवासन यांच्या चेन्नई येथील इंडिया सिंमेंट कंपनी परिसरात छापेमारी केली.  भ्रष्टाचाराच्या  आरोपांमुळे ईडीने इंडिया सीमेंट कंपनीवर छापा मारला. 

BCCI चे माजी अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्‍यक्ष आहेत. इंडिया सिमेंट्स देशातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही नववी सर्वात मोठी लिस्टेड सिंमेंट कंपनी आहे. इंडिया सिंमेंट्सचे तामिलनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणात सात प्‍लांट आहेत. विशेष म्हणजे २००८ ते २०१४ पर्यंत इंडिया सिमेंट्सकडे इंडियन प्रीमियर लीगमधील फ्रेंचाइजी चेन्नई सुपर किंग्स संघाची मालकी होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकांनी बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कंपन्यावर छापा मारला आहे. सक्तवसुली संचलनालयाने इंडिया सिमेंट्स कंपनीच्या चेन्‍नई येथील अनेक कार्यालयांवर छापे मारले. ईडीकडून श्रीनिवासन यांच्या अन्य ठिकाणांवरही छापेमारी केली गेली. या कारवाईमुळे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढू शकतात. 

एन श्रीनिवासन आयपीएल फ्रेंचाइजी चेन्नई सुपर किंग्सचे मालक आहेत. २०२३ मध्ये एन श्रीनिवासन यांची टीम चेन्नई सुपर किंग्सचे नाव स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आले होते. त्यानंतर  सीएसकेवर २ वर्षांची बंदी लादली होती. दरम्यान एन श्रीनिवासन यांनाही बीसीसीआय अध्यक्षपद  सोडावे लागले होते. २००८ मध्ये एन श्रीनिवासन पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले होते. त्यानंतर २०११ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे अध्यक्ष बनवले गेले. 

WhatsApp channel

विभाग