मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी; पद, पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि पगार किती मिळणार? वाचा

Bank Of Baroda: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी; पद, पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि पगार किती मिळणार? वाचा

Jan 08, 2024 06:46 PM IST

Bank Of Baroda Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

Bank of Baroda
Bank of Baroda

Bank Jobs 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण- तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने बीसी पर्यवेक्षक पदासाठी अर्ज मागिवले आहेत. या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

बँक ऑफ बडोदा बीसी पर्यवेक्षक पदाच्या ०१ जागेसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असायला हवा. तसेच त्याला चांगले संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय २१ वर्ष ते ४५ वर्षपर्यंत असायला हवे. उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२४ आहे.

या अर्जासाठी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मुंबई मेट्रो दक्षिण क्षेत्र, दुसरा मजला, ३. वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड पिअर, मुंबई - ४०० ००१. नोकरीचे ठिकाण मुंबई असून पात्र ठरलेल्या उमेदरावाला दरमहा १५ हजार रुपये पगार मिळणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.bankofbaroda.in या वेबसाईट वर भेट द्यावी.

ट्रेंडिंग न्यूज

10th Pass Jobs : दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वे आणि बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज!

 

महत्त्वाचे:

- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.

- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२४ आहे.

- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.

- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

WhatsApp channel
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर