salary increment: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील कर्मचाऱ्यांना किंचित कमी वेतनवाढ मिळू शकते. जागतिक व्यावसायिक सेवा कंपनी Aon PLC ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती पुढे आली आहे. यंदा कर्मचाऱ्यांच्या पगारात ९.५ टक्के वाढ अपेक्षित आहे. दरम्यान, २०२३ मध्ये देशातील कर्मचाऱ्यांच्या पगारात ९.७ टक्के वाढ झाली होती. यंदा यात थोडी घट झाली आहे.
Aon PLC च्या वार्षिक सर्वेक्षणात ४५ उद्योगांमधील १ हजार ४१४ कंपन्यांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यानुसार, वित्तीय संस्था, अभियांत्रिकी, ऑटोमोटिव्ह आणि लाइफ सायन्सेस क्षेत्रातील कंपन्या या सर्वाधिक पगारवाढ देऊ शकतात, तर रिटेल आणि आयटी सेवा सर्वात कमी पगारवाढ देऊ शकतात.
उत्पादन कंपन्या, टेक कंपन्याया ९.५ टक्के पगार वाढ देऊ शकतात. तर सेवा क्षेत्रातील कंपन्या या ८.२ टक्के पगार वाढ देणे अपेक्षित आहे. स्टार्टअप्स देखील लेगसी आयटी सेवा कंपन्यांपेक्षा चांगले पैसे देऊ शकतात. Aon चा अंदाज आहे की ते २०२४ मध्ये सरासरी ८.५ टक्के वाढ देतील, पूर्वीच्या 9 टक्याच्या तुलनेत. बहुराष्ट्रीय कंपन्या ९.८ टक्के पगार वाढ देऊ शकतात. तथापि, वित्तीय संस्थांमध्ये सर्वाधिक वाढ ९.९ टक्के पगार वाढ दिली जाऊ शकते.
सर्वेक्षणानुसार, २०२२ मध्ये सर्वाधिक उच्च पगारवाढीनंतर, भारतातील पगारवाढ एक अंकी म्हणजेच १० टक्क्यांहून कमी झाली आहे. त्याच वेळी, २०२२ मधील २१.४ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १८.७ टक्क्यांपर्यंत कमी झाले. रुपंक चौधरी, मुख्य वाणिज्य अधिकारी, एओन, भारत, म्हणाले की, भारताच्या संघटित क्षेत्रातील वेतनातील अंदाजित वाढ विकसित होत असलेल्या आर्थिक परिस्थितीचे संकेत देते.