Austrelia Viral news : एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी करायचे असल्यास, एखाद्या कंपनीच्या बॉसकडे असंख्य करणे असू शकतात. काही वेळा तर ही कारणे इतकी शुल्लक असतात, की त्यासाठी कामावरून काढणे हे जरा अतिशयोक्तीचे वाटू लागते. मात्र जर नीट माहिती घेतली तर त्या कारणाचे गांभीर्य लक्षात येते. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. ते म्हणजे उशिरा पर्यंत जेवणाच्या सुट्टीवर गेल्याने एका महिला कर्मचाऱ्याची कंपनीने थेट हकालपट्टी केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
ददरम्यान, या घटनेवरून सोशल मीडियावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. काही लोकांच्या मते जे घडले ते योग्यच होते तर काहींच्या मते अशाप्रकारे एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढणे हे कामगार कायद्याच्या विरोधात आहे आणि त्यासाठी कंपनी मालकावर कारवाई करायला हवी.
या घटनेची माहिती अशी की, ऑस्ट्रेलिया येथील ट्रॉय होमस (Troy Holmes) या बांधकाम व्यावसायिकाने नुकताच सोशल मीडियावर एक किस्सा शेअर केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने एक पर्सनल असिस्टेंट नेमली होती.
या २२ वर्षीय तरुणीने इंटरव्ह्यूच्या वेळी अतिशय चांगल्या प्रकारे संवाद साधत स्वतः ची छाप उमटवली होती. त्यामुळेच तिला कामावर ठेवण्यात आले. मात्र त्यानंतर काहीच दिवसात तिने कामात टाळाटाळ करणे, कामचुकारी करणे सुरू केले. इतकेच नव्हे, तर त्या असिस्टंटने कामात देखील अनेक चुका केल्या आहेत. हद्द तर त्यावेळी झाली, जेव्हा ही कर्मचारी लंचब्रेक'च्या नावावर उशिरापर्यंत कामावर हजर झाली नव्हती.
तिला ऑफिसमध्ये उशिरा येण्याचे कारण विचारले असता, मला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मी लवकर कामावर येऊ शकले नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे तीने दिली. दरम्यान, कंपनीने त्वरित या महिला कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली. या तपासणीमध्ये सर्वकाही व्यवस्थित असल्याचे आढळले. या सर्व प्रकारामुळे बॉसने अखेर त्या महिला कर्मचाऱ्यास कामावरून काढण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या