Viral News : रजेच्या मंजुरीसाठी बॉसनं मागितला मूळव्याध झाल्याचा पुरावा! कर्मचाऱ्यानं असं काही केलं की बॉसची झोपच उडाली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : रजेच्या मंजुरीसाठी बॉसनं मागितला मूळव्याध झाल्याचा पुरावा! कर्मचाऱ्यानं असं काही केलं की बॉसची झोपच उडाली

Viral News : रजेच्या मंजुरीसाठी बॉसनं मागितला मूळव्याध झाल्याचा पुरावा! कर्मचाऱ्यानं असं काही केलं की बॉसची झोपच उडाली

Oct 23, 2024 06:20 PM IST

Viral News : मूळव्याधाने त्रस्त असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसकडे एक दिवसाची सुट्टी मागितली. मात्र, बॉसने मूळव्याध झाला असल्याचा पुरावा त्याला मागितला. यानंतर कर्मचाऱ्याने जे केले त्यामुळे बॉसक ही झोपच उडाली असून ही घटना सोधल मिडियावर व्हायरल झाली आहे.

रजेच्या मंजुरीसाठी बॉसने मागितला मूळव्याध झाल्याचा पुरावा! कर्मचाऱ्याने केलं असं काही की बॉसची झोपच उडाली
रजेच्या मंजुरीसाठी बॉसने मागितला मूळव्याध झाल्याचा पुरावा! कर्मचाऱ्याने केलं असं काही की बॉसची झोपच उडाली

Viral News : मुळव्याध हा एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे पीडित व्यक्तीच्या गुदद्वाराला सूज येऊन मोठ्या वेदला होता. या आजारबद्दल आजारी व्यक्ति बोलण्यास टाळतात. हा त्रास झाला असल्याचं सांगनं त्यांना लाजिरवाणं वाटतं असतं. मात्र, एका कर्मचाऱ्याला हा त्रास होत असल्याने त्याने त्याच्या बॉसला मुळव्याधीचा त्रास होत असल्यानं सांगून सुट्टी मागितली. मात्र, यावर त्याच्या बॉसने त्याला थेट मूळव्याध झाल्याचा पुरावा मागितला. यानंतर संतापलेल्या कर्मचाऱ्याने असे काही केले की बॉसची झोपच उडाली. ही घटना सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मूळव्याध हा एक गंभीर आजार आहे. या आजारात गुदद्वाराला खूप वेदना होतात. गंभीर प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. सहसा, मूळव्याधाच्या उपचारात, डॉक्टर गरम पाण्याने आंघोळ करणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि तिखट व थंड अन्न खाणे टाळण्याचा सल्ला देतात. मात्र, या कारणामुळे एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला ऑफिसमधून एक दिवसाची सुट्टी मागितली. मात्र, बॉसने त्याला पुरावा मंगणीतल्याने हा व्यक्ति सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

एका कर्मचाऱ्याला मूळव्याध असल्याने त्याने उपचार करण्यासाठी त्याच्या बॉसकडे एक दिवसाची सुट्टी मागितली होती. त्याला मूळव्याध असून त्याला उभेही राहता येत नसल्याचे त्याने बॉसला सांगितले. मात्र, रजा मंजूर करण्या ऐवजी बॉसने त्याला त्याच्या आजाराचा पुरावा मागितला. बॉसने त्याला मेडिकल प्रिस्क्रिप्शन मागितले जेणेकरून तो खोटे बोलत नाही हे सिद्ध होईल. मात्र, बॉसच्या या मागणीमुळे कर्मचारी संतापला. त्याने थेट त्याच्या मूळव्याधीचा फोटो काढून त्याच्या बॉसला पाठवला.

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्याने रेडिट पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी आज बॉसला फोन केला कारण मला मूळव्याध आहे आणि मी उभादेखील राहू शकत नाही. माझ्या मॅनेजरने माझ्याकडे रजा मंजूर करण्यासाठी मूळव्याध झाल्याचा पुरावा मागितला. त्यामुळे पुरावा म्हणून मी त्यांना माझ्या मूळव्याधीचा फोटो पाठवला. असे कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.

मात्र, फोटो पाठवल्यानंतर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होण्याची व बॉसच्या कारवाईची भीती या कर्मचाऱ्याला लागली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘आता मला असा प्रश्न पडतोय की, मी कंपनीचे नियम किंवा कायदे तोडले आहेत का? माझ्या मॅनेजरने एचआर किंवा पोलिसांना सांगितले तर मला त्रास होईल का?’ दरम्यान, त्याच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंटमध्ये त्यांच्यासोबत घडलेले अनुभव त्या व्यक्तीच्या पोस्टवर कमेन्ट करतांना शेअर केल्या आहेत.

काही काळापूर्वी बॉस आणि कर्मचाऱ्यामध्ये सुट्टीघेण्यावरून झालेले संभाषण व्हायरल झाले होते. रेडिटवरील पोस्टनुसार, मॅनेजर कर्मचाऱ्याला रजा मागायला गेला होता. नियमानुसार आजारपणासाठी रजा मागण्यापूर्वी सात दिवस आधी अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, कर्मचाऱ्याने एक दिवसाची सुट्टी मागितली. त्याच्या मॅनेजरने सांगितले की, तुम्ही सात दिवस आधी या आपत्कालीन रजेसाठी अर्ज करायला हवा होता.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर