मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Airport : विमानाचे इंजिन हवेत थरारले! प्रवाशांचा जीव टांगणीला, दिल्ली विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लॅंडींग!

Delhi Airport : विमानाचे इंजिन हवेत थरारले! प्रवाशांचा जीव टांगणीला, दिल्ली विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लॅंडींग!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 26, 2024 03:59 PM IST

Delhi Airport : स्पाइसजेट विमान हवेत असतांना वाऱ्याच्या वेगाने विमानाचे इंजिन हादरू लागल्याने दिल्ली विमानतळावर आणीबाणी लागू करून विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. विमान एसजी १२३ ने सकाळी साडेदहा वाजता उड्डाण केले. पण विमानाला ११ वाजता पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरावे लागले.

स्पाइसजेट विमान हवेत असतांना वाऱ्याच्या वेगाने विमानाचे इंजिन हादरू लागल्याने दिल्ली विमानतळावर आणीबाणी लागू करून विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले.
स्पाइसजेट विमान हवेत असतांना वाऱ्याच्या वेगाने विमानाचे इंजिन हादरू लागल्याने दिल्ली विमानतळावर आणीबाणी लागू करून विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले.

Delhi Airport : दिल्लीहून निघालेल्या विमानाला आपत्कालीन परिस्थितीमुळे दिल्ली विमानतळावर उतरावे लागले. इंडिया गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या या विमानात काहीतरी तांत्रिक गडबड झाली. त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करावे लागले. विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche accident : अपघाताची जबाबदारी स्वत:वर घेण्यासाठी मुलाच्या आईची चालकालापुढे गयावया

स्पाईसजेटच्या विमानाने रविवारी सकाळी लेहसाठी उड्डाण केले. मात्र, काही वेळाने विमान दिल्ली विमानतळावर हे विमान पुन्हा परतले. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या विमानात सुमारे १३५ प्रवासी होते. विमान दिल्ली विमानतळावर यशस्वीरित्या उतरवण्यात आले आहे.

या विमानाचे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. यावेळी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली होती. विमान एसजी १२३ ने सकाळी साडेदहा वाजता उड्डाण केले. पण विमानात बिघाड झाल्याने ११ वाजता पुन्हा उतरावे लागले. विमानाच्या इंजिनमध्ये कंपन झाल्याचे सांगण्यात येत आहे. बोईंग ७३७-७ विमानाच्या उड्डाणानंतर काही वेळातच हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले.

Pune Porsche Accident: आरोपीच्या वाढदिवसानिमित्त आजोबाने दिली होती कोट्यवधीची आलीशान पोर्शे कार; मित्राची पोलखोल

काही माध्यमांच्या रिपोर्ट्समध्ये एका पक्ष्याने या विमानाने धडक दिल्याचे बोलले जात आहे. या मुळे इंजिनमध्ये मोठ्या प्रमाणात कंपन झाले. विमान हवेतच हादरू लागले. यामुळे विमानातील तब्बल १३५ जणांचा जीव हवेतच टांगणीला लागला. वैमानिकाने तत्परता दाखवत हे विमान मागे फिरवून पुन्हा दिल्ली विमानतळावर सुखरूप लॅंडींग केले तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

नेमके काय झाले ?

स्पाइसजेटचे एसजी १२३ हे विमान आज सकाळी १०.३० वाजता दिल्ली विमानतळावरून लेह येथे जाण्यासाठी उडाले. काही वेळ हे विमान उडाले. दरम्यान विमान हवेत असतांना अचानक मोठी कंपने विमानात जाणवू लागली. यामुले प्रवाशांची घबराट उडाली. अनेक प्रवासी घाबरून ओरडू लागल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, ही बाब वैमानिकाने दिल्ली विमानतळाला दिली. वैमानिकाने हे विमान पुन्हा माघारी फिरवून दिल्ली विमानतळाकडे वळवले. दिल्ली विमानतळावर आणीबाणी लागू करून या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. तब्बल १३५ प्रवासी या विमानात होते. विमानाचे लॅंडींग होई पर्यन्त प्रवासी चिंतातुर होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग