Elon Musk news : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति असलेले एलोन मस्कचे यांच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांनी सेन्सॉरशिपच्या लावण्याचे आदेश दिल्यावर कंपनीने येथील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी एक्सनं म्हटलं आहे की, न्यायाधीश मोरेस हे एक्सच्या काही कायदेशीर प्रतिनिधीवर प्लॅटफॉर्मवरून काही मजकूर काढून टाकण्यासाठी दबाव आणत होते. ऐवढेच नाही तर कंपनीने तसे न केल्यास कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्याची धमकी देखील दिली होती.
एक्सच्या ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्स टीमने एका पोस्टमध्ये या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. या पोस्टमध्ये स्वतः एक्सने लिहिले आहे की कंपनी ब्राझीलमधील आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ येथील कामकाज बंद करत आहे. पोस्टनुसार, कामकाज बंद करण्यात येत असलं तरी नागरिकांसाठी एक्सची सुरू राहणार आहे.
एलोन मस्क यांनी देखील एक्सवर यासंदर्भात पोस्ट एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी लिहिलं आहे की, ब्राझीलमधील कार्यालय बंद करण्याचा निर्णय खूप कठीण होता. मस्कच्या या पोस्टवरून असा अंदाज वर्तवला जात आहे की मोरेस एक्सवर गुप्त सेन्सॉरशिप आणि खाजगी माहिती देण्यासाठी दबाव आणत होते. मस्कने या पोस्टमध्ये न्यायाधीश मोरेस यांचाही उल्लेख केला आहे.
ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात केलेल्या असंख्य अपिलांवर कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे. ब्राझीलमधील आपले कामकाज बंद केले असले तरी, एक्सची सेवा ही ब्राझिलियन वापरकर्त्यांसाठी सुरू राहील. आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला याचे आम्हाला खूप दु:ख आहे. ही जबाबदारी पूर्णपणे अलेक्झांडर डी मोरेस यांची आहे. त्यांची कृती लोकशाही विरुद्धची आहे.
वर्षाच्या सुरुवातीला मोरेस यांनी एक्सला काही खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते, कारण ते अतिउजव्या विचारसरणीचे होते. माजी राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सोनारो यांच्या सरकारच्या काळात खोट्या बातम्या आणि द्वेषपूर्ण संदेश पसरवल्याचा आरोप देखील त्यांनी करत "डिजिटल मिलिशिया"ची चौकशीचे आदेश त्यांनी दिले होते.
मस्क यांनी एक्सवरील खाती पुन्हा सक्रिय करणार असल्याचे सांगितल्यानंतर मोरेस यांनी या वर्षाच्या सुरुवातीला एक्सची चौकशी सुरू केली. मस्क यांनी एक्ससंदर्भात मोरेस यांच्या निर्णयांना "घटनाबाह्य" म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणात ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.