मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एक्सचा डेटा झाला लिक! तब्बल २० कोटी यूझर्सची माहिती धोक्यात! सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी आधी करा

एक्सचा डेटा झाला लिक! तब्बल २० कोटी यूझर्सची माहिती धोक्यात! सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी आधी करा

Jul 10, 2024 02:47 PM IST

Elon musk x data leak : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या इलॉन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या (पूर्वी ट्विटर) कोट्यवधी यूझर्सचा डेटा लीक झाला आहे.

एक्सचा डेटा झाला लिक! तब्बल २० कोटी यूझर्सची माहिती धोक्यात! सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी आधी करा
एक्सचा डेटा झाला लिक! तब्बल २० कोटी यूझर्सची माहिती धोक्यात! सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी आधी करा

Elon musk x data leak : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या इलॉन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या (पूर्वी ट्विटर) कोट्यवधी यूझर्सचा डेटा लीक झाला आहे. तब्बल २  कोटी यूझर्स यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. मात्र, एक्सने यूझर्सची माहिती लिक झाल्याच्या घटनेला नकार दिला आहे. सायबर फ्रॉड संशोधकांनी दावा केला आहे  तब्बल ९.४ जीबी (प्रत्येकी अंदाजे १ जीबी च्या १० फायली) लिक झाल्या असून यात एक्सच्या यूझर्सचे ईमेल, पत्ते आणि इतर खात्यांची खाजगी माहिती आहे. हा डेटा लिक झाल्यामुळे एक्सच्या वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो.

लीक झालेला डेटा ७ जुलै २०२४ रोजी "मिचुपा" नावाच्या नवीन खात्याद्वारे लिक करण्यात आला. असे म्हटले जात आहे की, लीक झालेल्या डेटामध्ये डाउनलोड करण्यायोग्य लिंक देखील आहे. ज्यामुळे यूझर्सना मोठा त्रास होऊ शकतो. या लीक झालेल्या एक्स खात्यांशी संबंधित ईमेल पत्ते यूझर्सना स्पॅम करण्यासाठी, फिशिंग हल्ले करण्यासाठी आणि इतर सायबर फसणवुकीसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. तसेच इतरांची ओळख देखील चोरी होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

सुरक्षित राहण्यासाठी हे काम त्वरित करा

तब्बल २० कोटी यूझर्सचा डेटा लीक झाल्याने यूझर्स स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काही सुरक्षा टिप्स वापरून पाहू शकतात. यात पासवर्ड बदलणे, टू स्टेप व्हेरिफीकेशन, संशयास्पद ईमेल आणि मेसेजकडे दुर्लक्ष करणे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांनी ज्या डिव्हाइसवर लॉग इन केले आहे, त्यांची तपासणी करून तेथून आपली माहिती डिलिट करावी. या सोबतच मजबूत सुरक्षा आणि डेटा सुरक्षा पद्धती लागू करू शकतात आणि सुरक्षा ऑडिटकरून सायबर हल्ले रोखू शकता तसेच या बाबत जागरूकता वाढवू शकतात.

२० कोटी यूझर्स धोक्यात

संशोधकांनी सांगितले की डेटा लिक झालेले २० कोटी यूझर्स यामुळे प्रभावित होऊ शकतात. फिशिंग, ओळख चोरी सायबर हल्ल्यांना त्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांनी सावध राहने गरजेचे आहे. हा डेटा हॅकर्सद्वारे प्रभावित ईमेल आयडीशी संबंधित असलेल्या खाती किंवा उपकरणांशी तडजोड करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो. हा डेटा हॅकिंग फोरमवर ९.४ जीबी दाखवत आहे. ट्विटर लीक केलेला डेटाबेस हा शेवटचा आहे. यात ईमेल पत्ते, नावे आणि ट्विटर खात्याचे तपशील असलेले २० कोटींहून अधिक रेकॉर्ड लिक असे डार्क नेटवर देखील आढळून आले आहे.

WhatsApp channel
विभाग