मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Elon Musk : इलॉन मस्कचा भारतीयांना दणका! ३० दिवसांत १.८५ लाखांहून अधिक 'एक्स' अकाऊंट बंद! 'ही' चूक करणे टाळा

Elon Musk : इलॉन मस्कचा भारतीयांना दणका! ३० दिवसांत १.८५ लाखांहून अधिक 'एक्स' अकाऊंट बंद! 'ही' चूक करणे टाळा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 12, 2024 10:55 AM IST

Elon Musk X bans over 1.85 lakh indian accounts : इलॉन मस्कच्या मालकीचे असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) गेल्या ३० दिवसांत १ लाख ८० हजाराहून अधिक भारतीय नगरिकांची खाती बंद करण्यात आली आहे.

इलॉन मस्कच्या मालकीचे असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) गेल्या ३० दिवसांत १ लाख ८० हजाराहून अधिक भारतीय नगरिकांची खाती बंद करण्यात आली.
इलॉन मस्कच्या मालकीचे असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) गेल्या ३० दिवसांत १ लाख ८० हजाराहून अधिक भारतीय नगरिकांची खाती बंद करण्यात आली.

Elon Musk X bans over 1.85 lakh indian accounts : इलॉन मस्कच्या मालकीचे असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून (पूर्वीचे ट्विटर) गेल्या ३० दिवसांच्या आत १ लाख ८० हजाराहून अधिक भारतीय नागरिकांची खाती बंद करण्यात आली आहेत. जर तुम्ही देखील एक्स वापरत असाल तर सावध व्हा. कारण तुमच्या एका चुकीमुळे तुमचे खाते बॅन होऊ शकते.

ट्रेंडिंग न्यूज

मोदींनी महाराष्ट्राचं प्रेम अनुभवलंय! आता शाप काय असतो तो अनुभवावा; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

एक्सने दावा केला आहे की त्याने २६ मार्च ते २५ एप्रिल दरम्यान भारतातील १,८४,२४१ खाती बंदी घातली आहेत. खरं तर, ही खाती कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन करून बाल लैंगिक शोषण आणि एखाद्याच्या संमतीशिवाय त्यांचे खासगी फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करणे किंवा शेअर करणे यांना प्रोत्साहन देत असल्याचे पुढे आले आहे.

Sambhaji Nagar: मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीसांच्या हाती लागलं मोठं घबाड; मोठी रक्कम जप्त

एक्सने मासिक अहवालात दिली कारवाईची माहिती

एक्सने असेही नोंदवले आहे की, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने या कालावधीत देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी १.३०३ खाती बॅन केली आहेत. एकूणच, एक्सने (पूर्वीचे Twitter) या कालावधीत १,८५,५४४ खात्यांवर बंदी घातली आहे. कंपनीने आपल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने, नवीन आयटी नियम, २०२१ अंतर्गत जारी केलेल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, या कालावधीत भारतातील वापरकर्त्यांकडून तक्रार निवारण यंत्रणेद्वारे १८,५६२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीने खाते बॅन करण्यासंबंधी अपील करणाऱ्या ११८ तक्रारींवर देखील सकारात्मक कारवाई केली.

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये वीज, पाणी, पिठासाठी युद्धजन्य परिस्थिती; वाढलेल्या किंमती विरोधात नागरिक रस्त्यावर

काही खात्यांचे निलंबन घेतले मागे

अनेक खात्यांची तपशीलवार माहिती घेतल्यावर एक्सने चार खात्यांचे निलंबन मागे घेतले. तर उर्वरित खात्यांवर बंदी घातली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. या अहवाल कालावधीत आम्हाला खात्यांबद्दल सामान्य प्रश्नांशी संबंधित १०५ जणांनी अर्ज केले होते असे अहवालात म्हटले आहे.

भारतातील बहुतांश तक्रारी बंदी उल्लंघन (७,५५५), त्यानंतर द्वेषपूर्ण वर्तन (३,३५३), संवेदनशील मजकूर (३,३३५) आणि गैरवर्तन/छळ (२,४०३) या बद्दल होत्या. २६ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान, एक्सने देशातील २,१२,६२७ खात्यांवर बंदी घातली.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने त्याच काळात दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या १,२३५ खात्यांवर देखील कारवाई करून ही खाती बंद केली होती. अलीकडे, इलॉन मस्कने जाहीर केले की वापरकर्ते आता केवळ स्पॅम आणि बॉट्स टाळण्यासाठी सत्यापित वापरकर्त्यांना उत्तरे मर्यादित करू शकतात.

IPL_Entry_Point

विभाग