एलन मस्क यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? 'या' गोष्टीसाठी करण्यात आलं नॉमिनेट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एलन मस्क यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? 'या' गोष्टीसाठी करण्यात आलं नॉमिनेट

एलन मस्क यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? 'या' गोष्टीसाठी करण्यात आलं नॉमिनेट

Jan 31, 2025 02:02 PM IST

Elone Musk nominated for the nobel peace prize : प्रसिद्ध अब्जाधीश आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलन मस्क यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्याची शक्यता आहे. मस्क यांना स्लोव्हेनियाच्या एका खासदाराने या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले आहे.

एलन मस्क यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? 'या' गोष्टीसाठी करण्यात आलं नॉमिनेट
एलन मस्क यांना मिळणार शांततेचा नोबेल पुरस्कार? 'या' गोष्टीसाठी करण्यात आलं नॉमिनेट

Elone Musk nominated for the nobel peace prize : टेस्लाचे सीईओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलन मस्क गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे चर्चेत आले आहेत. आपले विचार स्पष्टपणे मांडणारे अशी ओळख असलेले मस्क सध्या ट्रम्प सरकारमध्ये मिळालेल्या मंत्रिपदावरूनही चर्चेत आहेत. दरम्यान, मस्क यांच्याशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इलॉन मस्क यांना २०२५  च्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. युरोपियन संसदेचे सदस्य ब्रॅंको ग्रिम्स यांनी त्यांना हा पुरस्कार मस्क यांना देण्याची मागणी केली आहे.

शांतेच्या नोबल पुरस्कारासाठी मस्क यांना नामांकन मिळावे यासाठी   युरोपियन संसदेचे सदस्य ब्रॅंको ग्रिम्स यांनी मस्क यांचे नाव नॉर्वेजियन नोबेल समितीकडे याचिका पाठवली होती, ती मंजूर करण्यात आली आहे. मस्क यांनी गेल्या काही वर्षांत मूलभूत मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतर महत्वाच्या  मुद्द्यांवर मोठे  योगदान दिले आहे. त्यामुळे मस्क यांचे शांततेचे नोबल परितोषिकासाठी नामांकन करण्यात आले आहे.  

मध्य युरोपातील स्लोव्हेनियाचे खासदार ग्रिम्स यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. एलन मस्क यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततेच्या मूलभूत मानवी हक्कासाठी सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल २०२५  चे शांततेचे नोबेल पारितोषिक देऊ केले! यापूर्वी डिसेंबरमध्ये ग्रिम्स यांनी मस्क यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्याची मागणी केली होती.

डोनाल्ड ट्रम्पयांच्या मंत्रीमंडळात मस्क यांना मानाचे स्थान 

 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनीही मोठा खर्च केला. त्यांनी  डोनाल्ड ट्रम्प यांच्या जोरदार प्रचार केला. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत त्यांनी जवळपास २७७  दशलक्ष डॉलर खर्च केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना सरकारमध्ये स्थान देण्यासाठी स्वतंत्र विभागही तयार केला. त्याचे नाव सरकारी कार्यक्षमता विभाग असे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा एक व्यावसायिक व्यवहार असून याचा फायदा  इलॉन मस्क यांना  होईल.

इलॉन मस्क यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये कार्यालयही दिले जाऊ शकते, अशीही चर्चा होती. 'द टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुसी वायल्स यांनी एलन मस्क वेस्ट विंगमध्ये काम करणार नसल्याचे म्हटले आहे. त्याचं ऑफिस दुसऱ्या इमारतीत असेल. त्यांच्यासोबत किमान २० जण काम करतील.

एलन मस्क यांची राजकीय भूमिका समजून घेणे सोपे नाही. ते स्वत:ला डाव्या विचारसरणीचे उदारमतवादी समजतात. अशा तऱ्हेने डोनाल्ड ट्रम्प यांना मस्क यांनी पाठिंबा देणंही विचित्र आहे. मस्क म्हणाले होते  की त्यांनी २००८ आणि २०१२ मध्ये बराक ओबामा यांना मतदान केले होते. त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन आणि २०२० मध्ये जो बायडेन यांना मतदान केले. यानंतर त्यांनी त्यांची विचारसरणी बदलली आणि  डोनाल्ड ट्रम्प यांच्या जाहीर प्रचार केला.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर