डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचार रॅलीत एलॉन मस्क यांचा भन्नाट डान्स; म्हणाले, 'संविधान वाचवायचे असेल तर....'
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचार रॅलीत एलॉन मस्क यांचा भन्नाट डान्स; म्हणाले, 'संविधान वाचवायचे असेल तर....'

डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचार रॅलीत एलॉन मस्क यांचा भन्नाट डान्स; म्हणाले, 'संविधान वाचवायचे असेल तर....'

Updated Oct 06, 2024 01:34 PM IST

elon musk dance in trump political rally : माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीमध्ये जगातील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी स्टेजवर डान्स करत निवडणूक रॅलीला संबोधित करताना ट्रॅम्प यांना जिंकून आणण्याचे आवाहन केले.

डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचार रॅलीत एलॉन मस्क यांचा भन्नाट डान्स; म्हणाले, 'संविधान वाचवायचे असेल तर....'
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचार रॅलीत एलॉन मस्क यांचा भन्नाट डान्स; म्हणाले, 'संविधान वाचवायचे असेल तर....'

elon musk dance in trump political rally : अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनियातील बटलर येथे भरलेल्या निवडणूक रॅलीत जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेत स्टेजवर डान्स केला. यावेळी त्यांनी रॅलीमध्ये उपस्थित नागरिकांना माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना विजयी करण्याची आवाहन देखील केले. 

या रॅलीत मस्क यांनी ऑल ब्लॅक ड्रेस घातला होता. तर डोक्यावर कस्टम एमएजीए (मेक अमेरिका ग्रेट अगेन) टोपी घातली होती. मस्क व्यासपीठावरून बोलतांना म्हणाले, अमेरिकेचे संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना जिंकणे आवश्यक आहे. ट्रम्प यांच्यावर या पूर्वी ज्या ठिकाणी हत्येच्या प्रयत्न करण्यात आला होता, त्याच ठिकाणी या निवडणूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मस्क यांनी वरील वक्तव्य केले. या निवडणुकीत मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

अमेरिकेत पेन्सिल्व्हेनिया येथे झालेल्या एका सभेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. या ठिकाणी एलॉन मस्क देखील उपस्थित होते.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम उपस्थितांना संबोधित केले. भाषण आटोपल्यानंतर त्यांनी एलन मस्क यांचे स्टेजवर स्वागत केले. या नंतर मस्क यांनी निवडणूक रॅलीला संबोधित केले. मस्क म्हणाले, "राज्यघटनेच्या रक्षणासाठी ट्रम्प यांना ही निवडणूक जिंकावी लागेल. अमेरिकेत लोकशाही टिकवण्यासाठी ट्रम्प यांना निवडणूक द्यायलाच हवे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करताना मस्क यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह डेमोक्रॅटिक पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांवरही निशाणा साधला. मस्क यावेळी खूप उत्साही दिसत होते.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका करतांना मस्क म्हणाले, आपले राष्ट्राध्यक्ष असे आहेत जे नीट पायऱ्या देखील चढू शकत नाहीत. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यावर देखील ते न घाबरता प्रचार करत आहेत.

दुसरीकडे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा १० ऑक्टोबरपासून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. निवडणुकीच्या दिवशी ओबामा हॅरिस यांच्या प्रचारात मदत करतील. प्रमुख राज्यांमध्ये त्यांची भाषणे नियोजित आहेत, त्यापैकी पहिले पेनसिल्व्हेनिया येथ असेल. अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधित्व उपराष्ट्रपती कमला हॅरिस करणार आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर