मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Elon Musk Companies Acquiring Thousands Acres Land Texas To Start A Town

Elon Musk : एलॉन मस्क वसवणार स्वत:चे नवीन शहर.. वाचा कुठे असेल हे ठिकाण व कारण काय?

Elon Musk
Elon Musk
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Mar 12, 2023 11:19 PM IST

Elon Musk Is Planning To Build A Town : जगातील दुसऱ्या नंबरचे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) स्वतःचे शहर वसवण्याच्या विचारात आहेत. यासाठी टेक्सासमध्ये हजारो एकर जमीन खरेदी केली जात आहे.

अब्जाधीश एलॉन मस्क आता आपले स्वत:चे शहर वसवण्याच्या तयारीत आहेत.  रिपोर्टनुसार  मस्क यांच्याशी संबंधित यूनिट्स आणि त्यांच्या कंपन्या टेक्सासमध्ये हजारो एकर जमीन खरेदी करत आहेत. सांगितले जात आहे की, येथे जे शहर वसवले जाईल तेथे मस्क यांच्या कंपन्यांचे कर्मचारी राहणार आहेत. रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, ऑस्टिनजवळ आतापर्यंत ३,५०० एकर जमीन खरेदी केली गेली आहे. मस्क येथे जे शहर वसवणार आहेत, त्याचे नाव 'स्नेलब्रुक' ठेवले जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्टमध्ये लँड रेकॉर्ड्स आणि इंटरनल कंपनी कम्युनिकेशनच्या आधारावर शहराविषयी माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार एलन मस्क यांची इच्छा आहे की, त्यांच्या कंपन्या  Boring Co, टेस्ला आणि स्पेसएक्सचे कर्मचारी येथे निवास करतील. या शहरात बाजारभावाच्या तुलनेत घरांचे भाडे कमी असेल. ऑस्टिनजवळ या सर्व कंपन्यांची मोठी प्रॉडक्शन फॅसिलिटीज आहेत. त्यामुळे या शहराजवळ नवीन टाउन वसवण्याचा प्रयत्न आहे. 

१०० हून अधिक घरांच्या निर्माणाची योजना - 
रिपोर्टनुसार मस्क यांची योजना १०० घरे बांधण्याची आहे. त्याचबरोबर शहरात स्विमिंग पुल आणि आउटडोर स्पोर्ट्स एरियाही पुरवला जाईल. यापूर्वी २०२० मध्ये मस्क यांनी घोषणा केली होती की, ते टेस्ला कंपनीचे मुख्यालय आणि आपले निवासस्थान कॅलिफोर्निया येथे हलवणार आहेत. दरम्यान २०२२ मध्ये टेस्ला कंपनीने ऑस्टिनमध्ये नवीन गिगाफॅक्ट्री मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली. तसेच स्पेसएक्स आणि बोरिंग कंपनीजवळ टेक्सासमध्येही ही सुविधा आहे. 

सांगितले जात आहे की, एलन मस्क यांची टीमने बास्ट्रोप काउंटीमध्ये टाउन सामील करण्याविषयी चर्चाही केली आहे. मात्र काउंटीकडून म्हटले आहे की, याबाबत कोणताही अर्ज आलेला नाही. दुसरीकडे असेही वृत्त आहे की, मस्क यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक व्यवस्थापकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. सांगितले जात आहे की, मस्क यांनी आपल्या  टीममधील  सर्वश्रेष्ठ कर्मचाऱ्यांची यादी देण्यास व्यवस्थापकांना सांगितले होते. 'बॉस' त्या आदेशाने मॅनेजर्सने  आपल्या टीममधील सर्वश्रेष्ठ कर्मचाऱ्यांची यादी त्यांच्याकडे सोपवली. मात्र त्यानंतर मस्कने या मॅनेजर्सना नोकरीवरून काढून टाकले.

WhatsApp channel

विभाग