एकाच दिवसांत मोजली ६४ कोटी मतं! अब्जाधीश एलन मस्क झाले भारतीय निवडणूक यंत्रणेचे फॅन; अमेरिकन पद्धतीवर केली टीका
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एकाच दिवसांत मोजली ६४ कोटी मतं! अब्जाधीश एलन मस्क झाले भारतीय निवडणूक यंत्रणेचे फॅन; अमेरिकन पद्धतीवर केली टीका

एकाच दिवसांत मोजली ६४ कोटी मतं! अब्जाधीश एलन मस्क झाले भारतीय निवडणूक यंत्रणेचे फॅन; अमेरिकन पद्धतीवर केली टीका

Nov 24, 2024 11:53 AM IST

elon musk became fan of indian election : टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे भारतीय निवडणुकांचे चाहते झाले आहेत. भारतात एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी करण्यात आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर अमेरिकन निवडणुका होऊन देखील कॅलिफोर्नियात अजूनही मतमोजणी सुरू असल्याने त्यांनी टीका केली आहे.

एकाच दिवसांत मोजले ६४ कोटी मतं! उद्योगपती एलन मस्क झाले भारतीय निवडणूक यंत्रणेचे फॅन; अमेरिकन पद्धतीवर केली टीका
एकाच दिवसांत मोजले ६४ कोटी मतं! उद्योगपती एलन मस्क झाले भारतीय निवडणूक यंत्रणेचे फॅन; अमेरिकन पद्धतीवर केली टीका (AP)

elon musk became fan of indian election : टेस्लाचे सीईओ आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक इलॉन मस्क देखील भारताच्या मतदान प्रणालीचे फॅन बनले आहेत. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत अमेरिकन निवडणूक यंत्रणेवत टीका केली आहे. मस्क यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की,  कॅलिफोर्नियातील निवडणुकीनंतर एका दिवसात भारताने ६४ कोटी मतांची मोजणी केली,  तर १५ दिवस उलटूनही कॅलिफोर्नियात अजूनही मतमोजणी सुरू आहे. एक्सवरील एका युजरने सांगितले की, ट्रम्प यांनी आपल्या पोर्टफोलिओची विभागणी केली आहे त्यामुळं अजूनही कॅलिफोर्नियामध्ये मोजणी केली जात आहे. यानंतर आणखी एका युजरने म्हटले की, भारतातील फसवणूक हे निवडणुकीचं पहिलं ध्येय नाही. त्यामुळे एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी पूर्ण करणं शक्य झालं.

अमेरिकेत ५ नोव्हेंबर ला निवडणुका झाल्या. निवडणुक होऊन १८ दिवस झाले आहेत. कॅलिफोर्नियामध्ये अजूनही २ लाखांहून अधिक मतांची मोजणी सुरू आहे.  अमेरिकेच्या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी घोषित झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाला ३१२ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. बहुमतासाठी केवळ २७० इलेक्टोरल मतांची गरज होती.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना २६६ इलेक्टोरल मते मिळाली. जो बायडन सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. २० जानेवारीला कॅपिटल हिलवर सत्तेचे हस्तांतर केले जाणार आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणूंन व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतील.

इलॉन मस्क यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे कारण ते अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. मतमोजणीसाठी संगणकावर विश्वास ठेवता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. निवडणूका बॅलेट पेपरवर व्हायला हव्या असे मत त्यांनी व्यक्त केलं होतं. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन हॅक करणे सोपे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ६४.२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. हा एक विश्वविक्रम असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जी-७ देशांमध्ये भारतात दीडपट तर युरोपियन युनियनच्या २७ देशांपेक्षा ही संख्या अडीच पटाने अधिक आहे.

 

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर